Home जळगाव आहो आजोबा हे बरं नव्हं ???

आहो आजोबा हे बरं नव्हं ???

531

 

गुन्हा दाखल तपास सुरू

 

अमीन शाह

मृत्यू शय्येवर टिकायला आलेल्या एका 72 वर्षीय वृद्ध आजोबाने अजबच भांगळ करून टाकल्याची बातमी मिळाली असून
यावल तालुक्यातील अंजाळे येथे ७२ वर्षाच्या वृध्दाने एका लहान ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे ,

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , यावल तालुक्यातील अंजाळे येथे माहेर असणारी एक विवाहिता आपल्या मुलांसह माहेरी आलेली असता २ ऑगस्ट रोजी ही महिला आपल्या मुलांना घरीच सोडून आपल्या आई – वडिलांसह भुसावळ येथे कामानिमित्त गेली होती . घरीच अंगणात खेळणाऱ्या तिच्या सहा वर्षाच्या मुलीला ७२ वय असलेल्या विश्वनाथ हरी तायडे या वृध्दाने आमीष दाखवून त्याच्या घरात नेत अश्लील चाळे करत अत्याचाराचा प्रयत्न केला . मात्र बालिकेने आरडा ओरडा करत तेथून पळ काढला संबंधीत महिला ही आपल्या माता – पित्यासह घरी आली असता तिला तिच्या मुलीने हा प्रकार सांगितला . मात्र समाजात बदनामी होईल या भितीने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही . यानंतर संबंधीत महिला आपल्या मुलांना घेऊन सासरी निघून गेली . झालेला प्रकार बालिकेच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितला असता नातेवाईकाने चाईल्ड हेल्पलाईनला याबाबतची माहिती दिली . याची तातडीने दखल घेत हेल्पलाईन तर्फे जिल्हा समन्वयक अधिकारी भानुदास येवलेकर व वृषाली श्रीपाद जोशी यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पोलीसी कारवाईबाबत आश्वस्त केले असता अखेर यावल पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली . यानुसार बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोसह विविध कलमान्वये यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,