Home बुलडाणा एक कोटी रुपये लुटायला आला अन , पोलिसांच्या जाळ्यात अडकला ???

एक कोटी रुपये लुटायला आला अन , पोलिसांच्या जाळ्यात अडकला ???

611

बँक मॅनेजर च्या सतर्कतेमुळे एक कोटी रुपये वाचले ,

मुंबई येथील आरोपीस अटक ,

 

अमीन शाह

 

नांदुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेच्या मॅनेजरला एक कोटी रुपये गंडविण्याचा प्रकार आज ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उघड झाला मॅनेजरच्या सतर्कतेमुळे आरोपी ला अटक करण्यात आली आहे. फिरोज हुसेन खान रा टाटा पाॅवर कॉलनी मुरबाड रोड कल्याण ठाणे असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदुराचे मॅनेजर राजन संतोष कुमार सिंग राहणार हल्ली मुक्काम इंगळे ले आऊट नांदुरा यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आज सकाळी ११ वाजे दरम्यान फिरोज खान हुसेन खान हा बँकेत दोन डी डी घेऊन आला यातील एक डीडी ६७ लाख रुपयाचा व दुसरा डीडी ३३ लाख रुपयांचा होता दोन्ही डीडी बँकेत घेऊन आल्यानंतर म्हणाला,

की हे पैसे माझ्या खात्यात का जमा झाले नाहीत सदर डीडीची पाहणी केली असता त्या डीडी वर बँक मॅनेजर च्या नावाची बनावट सही दिसून आली या तक्रारीवरून आरोपी फिरोज हुसेन खान याच्या विरुद्ध कलम ४६७, ४६८ , ४२० , ५११ , भांदवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास नांदुरा पोलीस करीत आहे ,