Home मराठवाडा घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भीमराव डोंगरे यांचा सत्कार

घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भीमराव डोंगरे यांचा सत्कार

601

तीन तालुक्यातील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश…!

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्हा काँग्रेस पक्षाचे दमदार प्रभावी नेतृत्व असणारे तथा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सदस्य भीमराव डोंगरे यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे त्यांचा ता.२ सोमवार रोजी घनसावंगी तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने रघुनाथ ताठे ,अबंड तालुकाकॉग्रेस कमिटीच्या वतीने विठ्ठलसिंग राणा यांनी त्यांचा शाल श्री फळ देऊन सत्तकार केला.
गेल्या दोन वर्षापासून सातत्याने महत्वपूर्ण नेहमी रहदारी असलेल्या अंबड ते औरंगाबाद महानगराला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक 22 रोहिलागड किनगाव ते पारनेर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.ऐकेरी रस्त्यामुळे वाहतुकीस आडचन येत होती. त्यामुळे औरंगाबाद येथे दवाखाना , शैक्षणिक, व्यापारी आदी कामांनिमित्त जाण्यासाठी अत्यंत कमी अंतरा वरून जाणारा हा रस्ता अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही गावातील नागरिकाना तिन्ही तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला असून या रस्त्याच्या कामाचे आदेश मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांना नुकतेच देण्यात आले आहेत. लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून या रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व्यापारी तसेच नोकरदारांना ग्रामीण भागातून अंबड घनसावंगी जालना औरंगाबाद इत्यादी मोठ्या शहरात जाण्यासाठी या रस्त्यामुळे मोठा फायदा होणार आहे .घनसावंगी तालुक्यातील जनतेस औरंगाबाद शहर जवळ होणार आहे शेतकरी व्यापारी विद्यार्थी यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्याचा शासनाच्या वतीने दुपदरीकरण व डांबरीकरणास मंजुरी दिल्यानने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
या वेळी विठ्ठलसिंग राणा , कल्याणराव चिमणे, रघुनाथ ताठे, शे.अल्ली,शे.बशीर ,अशोक कंटुले ,राहुल शिंदे यांची उपस्थिती होती.

[  घनसावंगी तालुक्यातील व्यापा-यांना कमी अंतरावरून औरंगाबादला जाण्यासाठी हा रस्ता फायदेशीर अत्यंत महत्त्वाचा आहे.त्याचा फायदा व्यापा-यांना होईल -सुभाष तौर व्यापारी ]

[ गोदाकाठा वरूनऔरंगाबादला जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. आधीच गेल्या अनेक वर्षा पासुन गोदाकाठच्या रस्त्यांच्या दुराअवस्थेमुळे नागरीकांचे हाल होत आहेत.– इंद्रजित भोसले भादली ]