Home बुलडाणा डॉ पंजाबराव देशमुख अमरावती विद्यापीठाची फळबाग सोयाबीन चक्री भुंगी अळीची पीक पाहणी...

डॉ पंजाबराव देशमुख अमरावती विद्यापीठाची फळबाग सोयाबीन चक्री भुंगी अळीची पीक पाहणी व मार्गदर्शन

408

प्रतिनिधी 【रवि आण्णा जाधव】

देऊळगाव राजा :-तालुक्यातील देऊळगाव मही येथे विविध योजनेंतर्गत लागवड केलेल्या पेरू या फळबागेची व सोयाबीन या पिकाची पाहणी चा कार्यक्रम बुधवार (दि.२८) रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील प्रमुख शास्त्रज्ञ श्री डॉ.विनोद खडसे, डॉ. वाय.व्ही.इंगळे, सहाय्यक प्राध्यापक, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला, श्री डॉ. पी.के. राठोड यांचे सह श्री. विजय बेतीवार, कृषी उपसंचालक, बुलडाणा, श्री अनंता झोडे, तंत्र अधिकारी, बुलडाणा, , श्री आर.के. मासळकर, ता.कृ.अ.दे.राजा, तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री सतीश दांडगे, श्री रवी राठोड, हे अधिकारी उपस्थित होते यावेळी चर्चा करताना देऊळगाव मही येथील प्रतिष्ठित शेतकरी शे.जुल्फेगार शे.यासिन यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले तद्नंतर शिवार फेरी मध्ये लागवड केलेल्या पेरू बागेची व सोयाबीन पिकाची पाहणी केली त्यावेळी लखनऊ-49 (सरदार) या पेरूच्या जातीबद्दल माहिती दिली त्यावेळी शेतकरी शे.जुल्फेगार यांनी मागील 10 ते 15 वर्षापासून पेरू पिकाच्या नियोजनाबाबत माहिती दिली त्यामध्ये प्रामुख्याने लखनऊ -49 या जातीबद्दल कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले व इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याच जातीचे कलमे नवीन पेरू फळबाग तयार करताना वापरावी असे आव्हान केले.
सोयाबीन पिकाची पाहणी करताना शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा नियंत्रण करणेसाठी विविध उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.