Home मराठवाडा महाराष्ट्र मुस्लिम महासंघा च्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी शेरूभाई मोमीन गंगापूर

महाराष्ट्र मुस्लिम महासंघा च्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी शेरूभाई मोमीन गंगापूर

121

प्रतिनिधी

औरंगाबाद ‌-  सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या न्याय्य हक्कासाठी एकमेव लढा म्हणून महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे संपन्न झाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वाजेद आयुबभाई जागीरदार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष कौमे -खिदमत सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या निवडीचे पत्र यावेळी मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सत्कार देखील करण्यात आला ,, सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा जोडो महा अभियान युवा जोडो संकल्प अभियान तसेच जनसंपर्क अभियान सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहे, ( वार्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता ) संकल्प अभियान राबविण्यात येईल असे शेरूभाई मोमीन यांनी नमूद केले…. यावेळी गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथील तालुका अध्यक्षपदी मुसाखान यांची नेमणूक करण्यात आली प्रास्ताविक सैय्यद लियाकत अली यांनी केले यावेळी पाशु पटेल अब्दुल कय्युम आदी सह पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते….