Home पश्चिम महाराष्ट्र मानवसेवा हिच ईश्वर सेवा कोकण येथील पूरग्रस्त प्रवासी यांचे अरबी मदरस्यात माणुसकीचे...

मानवसेवा हिच ईश्वर सेवा कोकण येथील पूरग्रस्त प्रवासी यांचे अरबी मदरस्यात माणुसकीचे दर्शन….

222

प्रतिनिधि
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या प्रवाशांची अरबी मदरस्यात सोय करत मुस्लिम बांधवांनी माणुसकीचे दर्शन घडवले हा व्हिडीओ सध्या सोशल मिडिया वर व्हायरल होत आहे कोल्हापूर ला २५ जूलै रोजी पडलेल्या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाल होतं पुणे – बैंगलोर महा मार्ग बंद झाल्याने एस टि बसेस महाराष्ट्रातुन आलेली आणि खाजगी वाहतूक यांच्या पुढे अन्न ,पाणी ,निवा-याचा प्रश्न निर्माण झाला होता शिरोळी भागातच वाहन थांबवण्यात आली होती अशा वेळी मुस्लिम बांधव मदतीला धावून आले त्यांनी वाहन चालक बंडू जाधव यांनी आपला अनुभव सांगीतला कि चहा , नाष्टा ,जेवण , दिले यांच्या या कार्याचे आम्ही आभार मानतो खरतर संकटात धावून येतो तोच खरा देव असतो दरम्यान हि व्यवस्था करणारे मैनुद्दीन मुल्ला शकील किल्लेदार यांनी प्रवाशांना कोणत्याही समस्या भासु नये यासाठी आम्ही व माझे सहकारी प्रयत्नशिल आहोत असे हि म्हटलं आहे किमान २५०ते ३०० प्रवासी असुन ” अल्लाह ” ईश्वराने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली हेच आमचे भाग्य समजतो यातून परत एकदा हिंदू -मुस्लिम ऐक्याची भावना दिसून येत आहे.