Home विदर्भ वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार करा – प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई...

वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार करा – प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर

211

26 जुलै ला अमरावती येथे संघटन, समीक्षा, समन्वय व संवाद बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधि – मनिष गुडधे

अमरावती – मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा, शहर, तालुका व गाव पातळीपर्यंत वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटनेच्या कार्यप्रणालीची समिक्षा करुन आढावा घेण्यासाठी व आपल्या जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती समजुन घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर, महिला आघाडी राज्य महासचिव डाॅ. अरुंधती शिरसाठ व राज्य उपाध्यक्ष मा. गोविंद दळवी यांचा विदर्भ दौरा सुरु झाला आहे. आज 26 जुलै 2021 रोजी अमरावती जिल्ह्यात संघटन, समीक्षा, समन्वय व संवाद जावरकर हाँल, अमरावती येथे पार पडली.

या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हा-शहर कार्यकारिणी, महिला आघाडी जिल्हा- शहर कार्यकारिणी व सम्यक विद्यार्थी च्या पदाधिकारी सदस्य व असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. अमरावती येथील पक्ष प्रमुखांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपली चोख जबाबदारी पाळुन कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले, संगठन बांधणी व पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी कोणत्या बैठका दौरे केले व स्थानिक लोकांच्या हिताचे कोणकोणते मुद्दे हाताळले याची समिक्षा व आढावा घेण्यात आली. पुढे होणा-या, स्थानिक स्वराज संस्था निवडणूक व अमरावती महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर पक्ष प्रमुखांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

यावेळी मा. जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई यांनी प्रस्ताविक केले. डॉ. अरूंधती यांनी महिला आघाडी च्या पक्ष विस्ताराचे मार्गदर्शन केले. मा. निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती चे राजकारण व समाज कारण कसे चालते व ते वंचित च्या विस्ताराकरीता कसे उपयोगी पडेल याचे मार्गदर्शन केले. मा. गोविंद दळवी यांनी पक्षाच्या संघटनात्मक ढाचा पदाधिकारी यांची जबाबदारी या विषयावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात मा. रेखाताई ठाकुर यांनी पदाधिकारी व कार्यकर्तांना संबोधित करतांना असे म्हटले की, आज भाजपा, कांग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांची आलटुन पालटुन सत्ता येते पण तळागाळातील लोकांना याचा कोणताही फायदा होतांनी दिसत नाही. OBC आरक्षणावर हे फक्त तळ्यामळ्यातल राजकारण करत आहे. आज वंचित कडे मोठ्या आशेने जनता बघत आहे. बाळासाहेब मागील ४० वर्षांपासुन आंबेडकरी चळवळ एकहाती नेत आहे त्यांचे हात मजबुत करण्यासाठी आपल्याला आपले संघटन मजबुत करणे आवश्यक आहे तेव्हा वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कार्यकर्तांची एक मोठी फौज निर्माण करण्याचे आवाहन पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्तांना त्यांनी केले. त्यानंतर प्रत्येक पक्ष प्रमुख व पदाधिकारी यांना बोलवुन त्यांनी केलेल्या कामाचा लेखी अहवाल मागण्यात आला.