Home परभणी बसस्थानकातील तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यासाठी निघणार आठ दिवसात निविदा

बसस्थानकातील तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यासाठी निघणार आठ दिवसात निविदा

134

📱जुनी इमारत करणार जमीनदोस्त

📋विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची माहिती

📙सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केला होता पाठपुरावा

प्रतिनिधी
मोडकळीस आलेली गंगाखेड बसस्थानकाची जुनी इमारत पाडत त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशासाठी तात्पुरता प्रवासी निवारा उभारण्यासाठी येत्या आठ दिवसात निविदा काढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

गंगाखेड येथील बसस्थानकाची इमारत पाडून टाकावी अथवा तिचा वापर करू नये असा अहवाल आल्यानंतरही या इमारतीचा वापर सुरूच आहे. यासंदर्भात सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी एसटी महामंडळाचे गंगाखेड आगार प्रमुख रामेश्वर हाडबे यांच्याशी निवेदन देऊन वरिष्ठांना याची माहिती दिली होती .या निवेदनाची तात्काळ दखल घेत परभणीचे विभागिय नियंत्रण मुक्तेश्वर जोशी यांनी एक पथक पाठवून गंगाखेड बसस्थानकाच्या जुन्या इमारतीची पाहणी केली. येत्या आठ दिवसात गंगाखेड येथील बसस्थानकाची जुनी इमारत पाडून प्रवाशांना थांबण्यासाठी तात्पुरता निवारा उभारणार असल्याची माहिती जोशी यांनी सखाराम बोबडे यांना दिली. उड्डाण पुलाच्या कामामुळे आगारात बस येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असलेला रस्ता खराब झाला असून या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत अशी विनंती ही जोशी यांनी सखाराम बोबडे यांना केली. एकूणच सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी व वरिष्ठांशी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून प्रवाश्यात मात्र यासंदर्भात समाधान व्यक्त केले जात आहे.