Home विदर्भ यवतमाळ येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे उद्घघाटन

यवतमाळ येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे उद्घघाटन

596

विनोद पञे

यवतमाळ , दिनांक 24/07/2021 रोजी दुपारी 12:30 वाजता यवतमाळ येथे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे उद्घघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला . या नवीन वास्तूचे उद्घघाटन मा . न्यायमूर्ती श्री चंद्रकांत वसंत भडंग , पालक न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचे हस्ते करण्यात आले .

यावेळी राज्याचे धर्मादाय आयुक्त मा. श्री प्रमोद तरारे , अमरावतीचे धर्मादाय सहआयुक्त मा . श्री केदार जोशी , यवतमाळचे सहायक धर्मादाय आयुक्त मा. सौ शिवकन्या मडके व मा. श्री प्रशांत चव्हाण उपस्थित होते तसेच
या नवीन इमारतीत न्यायादानासाठी दोन कक्ष , न्यायीकप्रणाली असलेली सुसज्ज संगणक यंत्रणा , पीठासीन अधिकाऱ्यांसाठी दोन निजी कक्ष , जलद सेवेकरिता दूरदृष्य न्यायदान प्रणालीची व्यवस्था , अधिकारी कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था , न्यास नोंदणीच्या ऑनलाईन कामासाठी इंटरनेट व्यवस्था , अभिलेख कक्ष आदि . व्यवस्था नूतन इमारतीत करण्यात आली असल्याची माहिती दिली . कार्यक्रमाला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे न्यायीक अधिकारी , कर्मचारी तसेच वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .