Home बुलडाणा हिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,

हिवरा आश्रम येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,

606

 

दोघावर गुन्हा दाखल ,

 

अमीन शाह

शेजारच्या गावातील तरुणीला फोन कॉल करुन आपल्या मोटारसायकलद्वारे बाहेरगावी मित्राच्या रुमवर नेऊन तेथे बलात्कार करणाऱ्या व या कुकर्मामध्ये त्याला मदत करणाऱ्या दोघांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की , नमूद वेळी व ठिकाणी मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील १६ वर्षीय पीडित मुलगी हिला आरोपी उमेश लक्षण रहाटे , रा . पिंपळगाव उंडा , ता.मेहकर याने २३ जुलै रोजी सकाळी फोन कॉल केला . ” तुला हरिप्रसाद आंबोरे याच्या कडे माझी तक्रार करावयाची असेल तर तो चिखली येथे आहे मी चिखली येथे जात आहे तू माझ्या सोबत चल ” असे तो तिला म्हणाला . अश्या प्रकारे फसवून सदर पीडितेला आरोपीने आपल्या मोटारसायकलवर बसून चिखली येथील बस स्थानक परिसरातील डि.पी. रोडवरील आपला मित्र योगेश शंकर महाकाळ , रा . पिंपळगाव उंडा , ता.मेहकर याच्या रूमवर आणले . तिथे तिला कोंडून ठेवण्यात आले . त्यानंतर उमेश रहाटे याने तिच्यावर बलात्कार केला . यावेळी आरोपीचा मित्र योगेश महाकाळ याने रूमला बाहेरून कुलूप लावून तो निघून गेला . सदर घटनेची तक्रार पिडीतेने दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण हे करत आहेत .