Home विदर्भ अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”

अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त , “अंजनगाव पोलिसांची धडक कार्यवाही”

329

भातकुली प्रतिनिधी – धनराज खर्चान

अमरावती – अंजनगाव सुर्जी शहरातील बालाजी फ्लॅट मध्ये एका २१ वर्षीय युवकांच्या घरी शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली.

अंजनगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार २४जुलै दुपरला १ वाजताच्या सुमारास बालाजी फ्लॅट स्थित २१वर्षीय चंदू चंदनपती यांच्या घरी अंजनगाव पोलिसांनी धाड टाकली असता त्या युवकांच्या घरून ४तलवार ८ जांबिये व २ कटीयर जप्त करण्यात येऊन पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले.दोन दिवसांपूर्वी २२ वर्षीय विक्की वानखडे या युवकाने एका कँटीन मध्ये तलवार हाती घेऊन बसलेला फोटो फेसबुकवर अपलोड केला.हि तलवार अजय आसनकर २४वर्षीय काठीपुर अंजनगाव याची होती.

फोटो फेसबूकवर अपलोड होताच पी.एस.आय.सपकाळ यांनी शोध घेतला असता विक्की वानखडे याचे जवळून पंच गजानन हुरपुडे व श्रीकांत नाथे यांचे समक्ष नवीन बस स्टँड परिघ यांच्या पेट्रोल पंप जवळून एक तलवार व विक्की याचे बयान वरून चेतन चंदनपत्री यांच्या घराची झाडाझडती घेतली असता या घरात ४ तलवारी व १०निरनिराळे चालू सापडले अधिक तपास अंजनगाव सुर्जी पोलीस घेत आहेत.