Home बुलडाणा अंढेरा बीट जमदाराच्या कृपाआशीर्वादाने अवैध धंद्यानी घातले थैमान…!

अंढेरा बीट जमदाराच्या कृपाआशीर्वादाने अवैध धंद्यानी घातले थैमान…!

494

प्रतिनिधी:-{रवि आण्णा जाधव}

देऊळगाव राजा:-बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे पोलीस स्टेशन म्हणून अंढेरा पोलीस स्टेशन ला ओळखले जाते.या पोलीस स्टेशन अंतर्गत अठ्ठेचाळीस गावे येत असुन दोन ओसाड गावाचा समावेश येतो.अंढेरा पोलीस स्टेशन एकुण पाच बीट मध्ये विभागले असुन स्थानिक अंढेरा बीट मध्ये अवैध वरली मटका,जुगार मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातो.तसेच मलकापूर पांग्रा येथुन टु व्हिलर गावात येऊन सर्रास अवैध गुटखा विक्री केली जाते.तसेच अवैध रेती वाहतूक,अवैध देशी दारू बीट मध्ये ठिकठिकाणी खुले आम विकल्या जाते.या सर्वांवर कुठलीच कारवाई न करता बिट जमदार यांच्याकडुन सतत पाठीशी घातले जात असल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
[स्थानिक अंढेरा येथे काही प्रतिष्ठाने बंद तर काहींनी सुट!]

गेल्या दिड वर्षांपासून कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले असुन जिल्हा प्रशासन कडक अंमलबजावणी करत असुन जिल्हा त लाॅकडाऊन सुरू च आहे.अंढेरा येथे सायंकाळी चार वाजता स्थानिक बीट जमादार प्रतिष्ठाने बंद करतात.परंतु काही प्रतिष्ठाने सुरच असल्याने जे प्रतिष्ठाने बंद करण्यात आले त्या मालकानी काल दि.२१जुनला सायंकाळी स्थानिक पञकार यांच्याकडे होत असलेल्या भेदभाव बद्दल व्यथा मांडली असता पञकार यांनी याबाबत स्थानिक बीट जमादार यांना याबाबत विचार णा केली असता मी चार वाजता बस स्टॉप वरील सर्व प्रतिष्ठाने बंद केली.परंतु मी पोलीस स्टेशन मध्ये परतल्या नंतर जर कोणी प्रतिष्ठाने उघडत असतील तर मी काय करु तुम्ही सांगा? तसेच बिट जमादार हे जे प्रतिष्ठाने उघडी असतात त्यांना सांगतात माझी काही हरकत नाही.प्रतिनिधी नी फोन केला म्हणून मी आलो आहे.हे बिट जमादार पत्रकार यांच्या विरोधात जण सामान्य माणसाला भडकविण्याचे काम बिट जमादार करीत आहेत.असे काही प्रतिष्ठान मालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.वास्तविक अंढेरा पोलिस स्टेशन हे बस स्टॉप पासुन हाकेच्या अंतरावर असुन जे प्रतिष्ठाने उघडी असतात.त्यांना बीट जमादार यांच्याकडुन वारंवार पाठीशी घातल्या जाते.

“याबाबत बिट जमदार यांना विचारणा केली असता तक्रार कर्त्यानी मला कुठली व कोणाची प्रतिष्ठाने उघडी आहेत त्यांची नावे सांगावे मी कारवाई करतो”!
गजानन वाघ
बिट जमदार,अंढेरा