Home बुलडाणा नौकरीचे आमीष दाखवून सहा लाखाने गंडविले ,” आरोपीस पुणे येथून अटक”

नौकरीचे आमीष दाखवून सहा लाखाने गंडविले ,” आरोपीस पुणे येथून अटक”

470

हनिफ शेख ,

गेल्या काही वर्षांपासून सरकारने नौकरीवर गदा आनल्याने गावागावात शेकडो सुशक्षित बेरोजगार मुलांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . याच्याच गैरफायदा घेवून नौकरी करिता तडफत असलेल्या मेरा खुर्द येथील एका तरुणांकडून बँकेत नौकरी लावून देतो असे सांगून सहा लाखाने गंडविले . अशा तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी मोठ्या हुशारीने आरोपीला पुणे येथून गजाआड केले . आणि पोलिसांनी १५ आणि १६ तारखेला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने पहिल्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी एक असा दोन दिवसांचा पिसियार दिला .
अंढेरा पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मेरा खुर्द येथील रहिवाशी असलेले संजय कडूबा चेके यांचा मोठा मुलगा उमेश संजय चेके याचे बीएससी एग्रीचे शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे तो नौकरचा शोध घेवू लागला होता . परंतु संजय चेके हे पुणे येथे कांदा बियांच्या कंपनीत कामानिमित्त गेले होते . तेथे गावा कडील ब्रम्हपुरी गावातील शेतकरी दिपक बाजड सुध्दा होते त्यांची ओळख झाली त्यांच्या ओळखीतून पुणे येथील शुभम मनोहर पुडले वय २५ वर्ष या तरुणासोबत ओळख झाली . या तरुणाने अनेक मुले नौकरीला लावले आहेत असे दीपक बाजड यांनी संजय चेके यांना सांगितले . त्यामुळे संजय चेके यांनी स्वतःच्या मुलांसाठी नौकरीची मागणी केली . त्यामध्ये शुभम पुडले याने बँकेत नौकरी देतो पण नगदी सहा हजार रुपये द्यावे लागतील . चागली ओळख झाल्याने संजय चेके यांनी ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये प्रवीण बबन जाधव यांच्या कडे दिले आणि शुभम पुडले यांच्या खात्यात एक लाख रुपायाचे बँक मार्फत आरटीजीएस केले . मात्र पैसे देऊनही नौकरी मिळाली नाही .त्यामुळे संजय चेके यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला नौकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली . या तक्रारी वरुण ठाणेदार राजवंत आठवले यांनी आरोपी विरुद्ध कलम ४२० , ५०४, ५०६, ३४ भाडवी प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस फोनवर संपर्क केला असता आरोपिकडून उडवाउडवीची उत्तरे आणि बोली भाषा एकूण आपली गुपित चक्रे फिरविली आणि दुय्यम ठाणेदार मोहन पाटील , पोहेकॉ निवृत्ती पोफळे , वाघमारे यांना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले . या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल लोकेशनवरून पुणे शहरात तीन दिवस शोध घेतला आणि आरोपी शुभम मनोहर पुडले वय २५ वर्ष याला सिद्धविनायक कॉलनी येथून मोठ्या हुशारीने ताब्यात घेवून पोलीस स्टेशनध्ये गजाआड केले आणि १५ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला एक दिवसाचा आणि पुन्हा १६ तारखेला हाजर केले असता आणखी एक दिवसाचा न्यायालयाने पिसियार सुनावला . परंतु या प्रकरणात आणखी काही मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागणार का ही चर्चा रंगली आहे .