Home बुलडाणा शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या बालकांमधील दोन सख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या बालकांमधील दोन सख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू

489

प्रतिनिधी: ( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा – ही घटना वाकी बु.शिवारात घडली आहे.या घटनेमुळे वाकी बु.ता.देऊळगाव राजा येथील काकड यांच्या गावानजिकच्या शेतात शेततळे आहे.या शेततळ्यात अनेक मुले पोहण्यासाठी जात असतात.आज सकाळी गावातील सोहम परमेश्वर बनसोडे वय १४ अमर शंकर बनसोडे वय १६ व सुमीत परमेश्वर बनसोडे हे तिघे जण शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. या तिघांनीही शेततळ्यात उड्या मारला अमर व सोहम हे दोघे जण खोल पाण्यात बुडाले.सुमीत ची आरडा-ओरड आयकुण बाजूच्याच शेतात काम करीत असलेला मधुकर बनसोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड केली.त्यामुळे ग्रामस्थांनी शेततळ्याकडे धाव घेतली असता या तिघांनाही वाचविण्यासाठी प्रयत्न केले.त्यावेळी सुमितला वाचविण्यास ग्रामस्थांना यश आले.परंतु अमर व सोहम यांना बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही येथे दाखल केले.त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.