
मजहर शेख,नांदेड
नांदेड/माहूर : दि : ७ :- माहूर शहर मध्यवर्ती बसस्थानक समोरील विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माहूर येथे पुतळ्याच्या नियोजित जागेवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पायाभरणी भूमिपूजन सोहळा मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.

याप्रसंगी सदरील जागेसाठी गेल्या 25 वर्षापासून संघर्ष करणारे पुतळा समिती तथा बुद्ध विहार समिती माहूरचे अध्यक्ष आयु. प्रकाश गायकवाड, नगर सेवक तथा गट नेते दिपक दादा कांबळे, माहूर न.पं.च्या नगराध्यक्षा आयु. शितलताई जाधव, माजी नायब तहसीलदार आयु. पुंडलिकराव भगत, ज्येष्ठ समाजसेविका आयु. कमलाबाई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. रेणुकादास वानखेडे, धडाडीच्या महिला पत्रकार आयु. पद्माताई गिऱ्हे यांचे भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष आयु. राहुल सावित्रीबाई पुंडलिकराव भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन तथा आभार व्यक्त केले.
यावेळी विदर्भ न्युजचे संपादक उमेश लुटे, सिद्धार्थ तामगाडगे, महिला संगीता ढोके, महेंद्र वाघमारे, ज्योती कांबळे, विजय भगत, बिरसा ब्रिगेडचे विनोद खूपसे माधव कांबळे, आदित्य खंदारे, अरविंद कांबळे, श्रीरंग जगताप, गोकुळदास वंजारे, प्रा. अमोल गायकवाड, शुद्धोदन गवळी, रेणुकादास पंडित, माणिक बनसोड, एकनाथ मानकर, सुधीर साबळे, संदेश कायटे, सुभाष भगत, मुकींदा गवळी, खडसे, शशिकांत भगत , गौतम मुनेश्वर, प्रवीण वाघमारे यांच्यासह असंख्य आंबेडकरी बांधव उपस्थित होते. आजच्या या पायाभरणी सोहळ्याच्या प्रसंगी माहूर शहरात सर्वत्र अतिशय उत्साहाचे वातावरण होते.











































