Home बुलडाणा आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला ‘युनायटेड रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ चा...

आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला ‘युनायटेड रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ चा जाहीर पाठिंबा..!

232

रविंद्र शिंदे (सिंदखेड राजा)

काल सिंदखेड राजा जि, बुलढाणा येथे झालेल्या,आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला ‘युनायटेड रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे जिल्हा अध्यक्ष मा. सिद्धार्थ काळे यांनी स्पष्ट केले,
काल सिंदखेड राजा येथे आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्याच निवेदन पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना सिद्धार्थ काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली,कोविड-१९ च्या काळात कोरोना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी मोलाची भूमिका बजावत असताना त्या प्रमाणे त्यांना कामाचा मोबदला मिळत नाही,शासनाने इतर कंत्राटी आरोग्य कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत सहभागी करून ,आशा सेविका व गटप्रवर्तक यांना 18000 ते 22000 हजार वेतन लागू करावे,
केलेल्या कामाचा मोबदला त्वरित देण्यात यावा आशा विविध मागण्याच निवेदन काल पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांना सिद्धार्थ काळे यांच्या उपस्थित देण्यात आले या प्रसंगी युनायटेड रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ,युनायटेड रिपब्लिकन पार्टी चे अपंग विभाग जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव,विधानसभा अध्यक्ष जितेंद्र खरात,तालुका अध्यक्ष संतोष म्हस्के,उप अध्यक्ष सिद्धार्थ काहले,अशासेविका ज्योती नागरे,ज्योती इंगळे,ज्योती गढेकर इत्यादी शेकडो अशा वर्कर, गटप्रपर्टक या आंदोलनाला उपस्थित होते.