Home परभणी पडेगाव ते स्टेशन वडगाव पर्यंतचा केनलच्या बाजूचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

पडेगाव ते स्टेशन वडगाव पर्यंतचा केनलच्या बाजूचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

175

प्रतिनिधि

मुख्य कॅनॉलच्या बाजूचा रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना दळणवळणासाठी अडचणीत येत आहेत .मोठे मोठे खड्डे पडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी माजलगाव प्रकल्पाच्या गंगाखेड येथील सिंचन शाखेच्या शाखाधिकारीकडे परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
माजलगाव प्रकल्पाची सिंचन शाखा क्रमांक 21 चे शाखाधिकारी श्री पोले यांची बुधवारी परभणी लोकसभा उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी वडगाव स्टेशन पासून पडेगाव पर्यंत येणाऱ्या मुख्य कनोलच्या बाजूचा रस्ताचे हाल सांगण्यात आले. त्याचबरोबर लेखी निवेदन देऊन या रस्त्यावर पडलेले खड्डे, बाजूला वाढलेली झाडे झुडपे यामुळे या रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. पावसाळ्यामुळे या खड्ड्यात पाणी साचत असून या भागातून इकडून तिकडे वागणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैल गाड्यांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खत, बियाणे घेऊन येणारी वाहने यामुळे कॅनॉलमध्ये पडतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तरी याकडे लक्ष देऊन हा कॅनॉलच्या बाजूचा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याच वेळी या कनोलची देखरेख करणारे प्रेम सिसोदिया या कर्मचाऱ्यांशी मोबाईल वर संवाद साधत ही परिस्थिती सांगण्यात आली. मागील आठ दिवसापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली या रस्त्यावरून जेसीबी फिरविण्यात आली पण खड्डे जशास तसे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.