Home विदर्भ भातकुली तालुक्यातील अळणगाव येथे मागील ४ दिवसापासून पाणी पुरवठा बंद

भातकुली तालुक्यातील अळणगाव येथे मागील ४ दिवसापासून पाणी पुरवठा बंद

192

धनराज खर्चान

अमरावती – तालुक्यातील अळणगांव येथे दि.१९/६/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता पासून वीज वितरण कंपनीने अचानकपणे कोणतीही पूर्व सूचना न देता ग्रामीण पाणी पुरवठाचे विज देयक थकीत असल्यामुळे विज कनेक्शन बंद केले. त्याच्या सर्व गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ज्या लोकानी पाणी कर भरला त्यांना सुद्धा ज्या लोकांनी पाणी कर भरला नाही त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे .भर उन्हात गावातील पुरुष महिला व तसेच लहान मुलांना पायपीट करत गावातील लोकांना पेढी नदीपात्रातून वाट काढत २किलो मीटर गोपगव्हांन या गावातून जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते कारण अळणगांव येथे पाण्याचे दुसरे स्रोत कोणतेही नाही त्यामुळे गावातील लोकांची मागणी आहे की लवकरत लवकर पाणी पुरवठा पूर्ववत करावा