Home रायगड मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत पोलिसांना रेनकोटचे वाटप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत पोलिसांना रेनकोटचे वाटप

310

कर्जत – जयेश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आज दिनांक १२ जून रोजी रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या हस्ते, डी वाय एस पी ऑफीस कर्जत आणि कर्जत पोलिस स्टेशन येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण भोर यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील ,प्रदिप पाटील तालुका सचिव, माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र निगुडकर, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे कर्जत शहराध्यक्ष समीर चव्हाण नगरसेवक हेमंत ठाणगे ,शहर उपाध्यक्ष प्रज्योत घोसाळकर, शहर उपाध्यक्ष ओमकार मोरे शहर उपाध्यक्ष राजेश साळुंखे ,महाराष्ट्र सैनिक निलराज विचारे , संदेश काळभोर आणि अक्षय महाले आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घरेडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले.

प्रतिक्रिया
“पोलिस हा जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद साधून अहोरात्र काम करीत आहेत जनतेच्या सदैव रक्षणासाठी काम करीत असताना ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता काम करीत असताना स्वतः ची आरोग्याची काळजी घेतली जात नाही अनेकदा पाऊसात उभे राहून त्यांना काम करावे लागते.कोरोना महामारी व लाॅकडाऊन परिस्थितीत पोलीसांनी जीव धोक्यात घालून बंदोबस्त केला आहे त्यामुळे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे.त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पोलीस बांधवांना कर्तव्य बजावत असताना मुसळधार पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोटचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत.” जितेंद्र पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष, मनसे