Home विदर्भ तळेगावात संचार बंदीच्या नियमाला तिलांजली

तळेगावात संचार बंदीच्या नियमाला तिलांजली

214
0

इकबाल शेख 

तळेगाव (शा.पं.) : – वर्धा जिल्ह्यात संचार बंदी शिथिल करण्यात आली परंतु शासनाने ठरवुन दिलेले वेळेचे बंधन दुकानदार पाळताना दिसत नाही. त्यामुळे नियमाला तिलांजली दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

तळेगाव ला आजुबाजुचे ८ ते १० खेडे लागुन असल्याने येथे मोठी बाजारपेठ नसली तरी सर्वच साधन सामुग्री मिळण्याचे अनेक दुकाने आहे. तेव्हा शासन आदेशानुसार दुकाने ही दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे परंतु येथील बहुतांश दुकाने ही सायंकाळी ६ वाजे पर्यंत सुरू ठेवल्या जात आहे तर काही दुकाने अमर्यादित वेळेपर्यंत सुरू राहतं आहे. तेव्हा या दुकानदारांना अभय कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या नियमाची अमलबजावनी करणारी यंत्रणाच कुठेहि कार्यरत दिसत नसल्याने दुकानदार बिनधास्त मनमर्जीने नियमाचे सर्रास उल्लंघण करीत असल्याचे स्पष्ट चित्र तळेगावच्या बाजार पेठेत दिसत आहे. यंत्रणाच थंडावली असेल तर त्यांचेवर कारवाई कोण करणार असा प्रश्न सध्या उद्भवत आहे. सध्या बाजारपेठेतील दुकानदार व नागरीकांच्या बिनधास्त वावरामुळे कोरोनाचा समुळ नायनाट तर झाला नाहि ना.? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांना पडत आहे. ना मास्क ना सोशल डिस्टंन्सिग कुठेच पहावयास मिळत नाहि. तर दुकानासमोर कुठेही हात धुण्याची व्यवस्था नाही. हा सर्व प्रकार नियमांची अमलबजावनी करणारी यंत्रणा उघड्या डोळ्यांनी पहात असुन सुद्धा त्यांचा वचक कुनावरही नसल्याचेच स्पष्ट चित्र तळेगावात सध्या दिसत आहे.

Previous articleमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत पोलिसांना रेनकोटचे वाटप
Next articleपोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते धनराज खर्चान व त्याच्या सहकारी मंडळीने वाचविले वन्यप्राणी( नीलगाय) रोईचे प्राण
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.