Home मुंबई सिडकोने उभारलेल्या पत्रकार भवनाची माहिती सचिवांकडून पाहण

सिडकोने उभारलेल्या पत्रकार भवनाची माहिती सचिवांकडून पाहण

74
0

नवी मुंबई, दि. 11:- राज्याचे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सिडकोने उभारलेल्या नवी मुंबईतील पत्रकार भवनाची पाहणी केली.

त्यांच्यासमवेत कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला हे होते.  नवी मुंबई शहर, परिसरात पत्रकारांसाठी सिडकोने उभारलेली वास्तू भविष्यात माध्यमांसाठी, पत्रकारांसाठी उपयोगात येऊ शकते.  माहिती व जनसंपर्क विभागालादेखील भविष्यात या भवनाचा उपयोग होऊ शकेल असे डॉ.पांढरपट्टे यांनी सांगितले.  सिडकोकडून या भवनाची उभारणी करण्यात आली असून आतील कामे सुरु आहेत.

Unlimited Reseller Hosting