Home विदर्भ अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

240
0

रेशन दुकानदारास विकण्यात आलेल्या धान्यातून जमा झालेल्या कमीशनच्या पैशापैकी लाच मागणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या लिपीकास व अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

अमरावती  , दि. 11 – रेशन दुकानदारास विकण्यात आलेल्या धान्यातून जमा झालेल्या कमीशनच्या पैशापैकी लाच मागणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या लिपीकास व अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लिपीक हरीश सुभाषराव काळे (३१) रा. अंजनगांव सुर्जी व अजय नरेंद्र मुणे (३८) असे अटकेतील दोघांची नावे आहे. यातील तक्रारदाराच्या आईच्या नावाने सरकारी स्वस्त धान्याचे दुकान आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तक्रारदार यांचे स्वस्त धान्य दुकानामार्फत जून २०२० ते सप्टेंबर अशा चार महिन्याचे बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात आले होते. त्यांना चार महिन्याचे कमीशन म्हणून शासनाकडून देण्यात येणारे ३६ हजार रुपयाचे दहा टक्के प्रमाणे ३ हजार ६०० रुपये लाचेची मागणी लिपीक हरीश काळे यांनी केली. याप्रकरणाची तक्रार ए.सी.बी. कार्यालयात देण्यात आली. पडताळणीत काळे यांनी चार महिन्याचे कमीशन मागताना तडजोडी अंत २५०० रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी दुपारी अंजनगांव सुर्जी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कारवाई केली. एसीबीच्या पथकाने हरीश काळे व अजय मुणे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर अधिक्षक अरुण सावंत, उपअधीक्षक गजानन पडघन यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश इंगळे, पोलिस नाईक प्रमोद धानोरकर, शिपाई राजेश कोचे तसेच चालक सतीश किटुकले यांनी केली.

Previous articleसंकटाच्या या कळात कोणत्याही परिस्थिति शिक्षण सुरू ठेवण्यासाठी 11-कलमी कार्यक्रम राबवा – (शिक्षण तज्ञ) मुबारक कापडी
Next articleसिडकोने उभारलेल्या पत्रकार भवनाची माहिती सचिवांकडून पाहण
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.