Home बुलडाणा मातृतीर्थ सिंदखेडराजा जिजामाता नगर या ठिकाणी अवैध धंदे बंद करा या मागणी...

मातृतीर्थ सिंदखेडराजा जिजामाता नगर या ठिकाणी अवैध धंदे बंद करा या मागणी साठी महिलांसह नागरिकाची स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्याकडे साकडे…!

444
0

राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळ पासून अवघ्या दोनशे फुटावर असलेले जिजामाता नगर मध्ये अवैध धंदे चा उत…!

बुलढाणा प्रतिनिधी

मातृतिर्थ सिंदखेड राजा हे ऐतिहासिक शहर आहे या शहरांमध्ये राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळ पासून अवघ्या काही मीटर अंतरावर ती वसलेले राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने असलेले जिजामाता नगर याठिकाणी कोरोना काळामध्ये अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आलेला आहे अवैध दारू,विक्री गुटखा विक्री मोठ्या प्रमाणामध्ये जोरात मध्ये सुरू आहे जिजामाता नगर शहरा पासून थोडं अंतर असल्याकारणाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कमी लक्ष असल्याकारणाने या ठिकाणी अवैध धंदे करनाऱ्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा व दारू विक्री होत असते त्यामुळे कोरोना काळामध्ये गावांमधून व गावाच्या बाहेरून दारू गांजा खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईक येत असतात येणारे गिराईक हे गर्धुले,असल्याकारणाने ह्या ठिकाणी या लोकांमुळे महिला व मुली सुरक्षित नाहीत हे लोक या ठिकाणाहून ये-जा करतात व महिला मुलींची छेडछाड देखील करतात या ठिकाणी वारंवार असे प्रकार घडत असतात व या ठिकाणी लहान कमी वय अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेदेखील व्यसनाधिन होत आहेत या जाचाला कंटाळून स्थानिक महिला व नागरिकाचा या अवैध धंद्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये रोष उफाळून येत आहे या अवैध धंद्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी स्थानिक महिला व रहिवाशांनी शंभर ते दीडशे सह्या लेखी निवेदन सहित स्थानिक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सातव साहेब यांना दिले आहे यामध्ये प्रामुख्याने अवैध धंदे त्वरित बंद करावे या मागणीसाठी हे निवेदन दिले आहे व जर लवकरात लवकर या अवैध धंद्यावर कारवाई केली नाही तर मोठ्या भव्य मोर्चा पोलीस ठाणे वर धडकेल व याला जबाबदार संबंधित पोलिस प्रशिक्षण असेल असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिला व रहिवासी नागरिक सहभागी झाले होते स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पारवे यांनी स्थानिक रहिवाशांना ग्व्ही दिली आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्यांची माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्यावर त्वरित ॲक्शन घेऊन व व पोलीस निरीक्षक यांनी अभिनंदन केली आहे की आपण संघटित होऊन या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये पोलिस ठाण्यामध्ये येऊन आपण यावर ती रोष व्यक्त करत आहात त्याबद्दल स्थानिक पोलीस ठाण्याच्या वतीने मी आपल्या सर्व रहिवाशांचे अभिनंदन करतो व गव्ही देतो की त्वरित या अवैध धंद्यावर ती कारवाई करून आम्ही जिजामाता नगर हे अवैध धंदे मुक्त करू,यावेळी निवेदन देण्यासाठी प्रामुख्याने उपस्थिती स्थानिक नगरसेवक गौतम खरात,सिद्धार्थ काळे युनायटेड रिपब्लिकन पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष, दीपक भालेराव,चंद्रकांत बनसोडे,राजू गवई, आकाश आठवले, मुकेश जाधव, बाबासाहेब बनसोडे गजानन पुरंदरे दीपक जाधव किरण गवळी महेश जाधव सुरज गवळी गणेश भानुसे गोपाल सानप राजेश जाधव नितीन हिवाळे इत्यादी शेकडो कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशी उपस्थिती

Previous articleहालिवली ग्रामपंचायतीत ‘शिवस्वराज्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा,
Next articleनवरदेवाने नववधूच्या पायावर डोकं टेकलं, सगळेच झाले हैराण……
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.