Home महत्वाची बातमी नवरदेवाने नववधूच्या पायावर डोकं टेकलं, सगळेच झाले हैराण……

नवरदेवाने नववधूच्या पायावर डोकं टेकलं, सगळेच झाले हैराण……

564
0

सौजन्य – सोशल मिडिया 

सध्या सोशल मीडियावर एक फोटो जबरदस्त व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक नवरदेव चक्क नववधूच्या पायावर डोकं टेकताना दिसत आहे. त्याच्या अश्या वागण्याने उपस्थित सगळेच हैराण झाले आहेत. मात्र फोटो व्हायरल झाल्यानंतर नवरदेवाकडून दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे.
या फोटोवर नवरदेवाकडून उत्तर देताना डॉ.अजित यांनी लिहिले, माझ्या वंशाला तिच पुढे नेणार, माझ्या घराची ती लक्ष्मी असणार आहे, माझ्या आई-वडिलांची काळजी घेणारी, त्यांची सेवा करणारी तिच असणार, प्रसूतीच्या वेळी माझ्या बाळासाठी होणाऱ्या मरणयातना सहन करणारी तिच असणार, माझ्या घराचा पाया ती असणार आणि तिच्या वागणूकीतूनच माझी ओळख होणार आहे. तिच्या जीवाभावाच्या माणसांना सोडून तिने माझ्याशी नाते जोडले आहे. पुढे डॉ.अजित सांगतात की, जर ती माझ्यासाठी एवढं सगळं करु शकते तर मी तिला तेवढा सन्मान देऊ शकत नाही का? स्त्रीयांच्या चरणी डोकं ठेवणं विनोदी वाटत असेल तर मला जगाची पर्वा नाही.

Unlimited Reseller Hosting