Home बुलडाणा वाह रे शैताण , स्वतः च्या जन्मदात्या आईवरच मुलाने केला बलात्कार

वाह रे शैताण , स्वतः च्या जन्मदात्या आईवरच मुलाने केला बलात्कार

1570
0

 

अमीन शाह ,

बुलडाणा : आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना जिल्हयातील पिंपळगाव सराई येथे ५ जूनच्या रात्री घडली . आपल्या जन्मदात्या आईवर ४५ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा लाजिरवाना प्रकार उघडकीस आला आहे . नराधम अरोपी मुलाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला केला असून तो नराधम सध्या फरार झाला आहे . रायपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणा – या पिंपळगाव सराई येथील हमाली करणा – या नराधमांने आपल्या ६५ वर्षीय आईवरच अत्याचार केला . पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले . रविवारी सकाळी आईने रायपूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे . या घटनेची वार्ता गाव परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे . विशेष म्हणजे या नराधम शैतानाला मुलगा , मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे . बरेच दिवसापासून तो दारुच्या नशेत पत्नीस व आईस मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली . फरार आरोपीचा शोध सुरू असून घडलेल्या घटने मूळे संताप वायकत केला जात आहे ,

Previous articleही तर लोकशाही, भारतीय संविधान व राष्ट्रध्वज संहितेची पायमल्ली
Next articleभाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार – आमदार प्रशांत ठाकूर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.