Home मुंबई ही तर लोकशाही, भारतीय संविधान व राष्ट्रध्वज संहितेची पायमल्ली

ही तर लोकशाही, भारतीय संविधान व राष्ट्रध्वज संहितेची पायमल्ली

342

सरकारवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची रिपाई डेमोक्रॅटिक ची मागणी

मुंबई , (प्रतिनिधी) – ६ जूनला भगवा ध्वज फडकवून शिवस्वराज्य दिन साजरा करणे म्हणजे लोकशाही, भारतीय संविधान व राष्ट्रध्वज संहितेची पायमल्ली असून सरकारवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया डेमोक्रॅटिक चे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी व्यक्त केले.

कनिष्क कांबळे पुढे म्हणाले की इतिहास न पाजळता भारतीय संविधानाचे पालन करून राज्यकारभाराची सूत्रे हलवावीत, ठाकरे सरकारने संविधानिक मर्यादा पाळाव्यात सीमोल्लंघन करू नये. राजकीय आतंकवादि भूमिके पासून माघार घ्यावी.
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या GR विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावु.

विविध धर्म व संस्कृतींनी हा देश नटलेला आहे. भविष्यात अन्य विचाराचे सरकार आल्यास ते हिरवा, निळा, पिवळा किंवा वेगळा रंगाचा ध्वज फडकविण्याचा GR काढतील हे कृत्य निषेधार्ह आहे. असल्याचे स्पष्टीकरण कनिष्क कांबळे यांनी दिले.

छत्रपती शिवराय राज्याचे आराध्य दैवत आहेत, त्यांचा मान सन्मान हा प्रत्येक भारतीयांना हवाच, मात्र: आपण लोकशाही प्रणित देशात राहतो. त्यामुळे संविधानिक पद्धतीने राष्ट्र ध्वजसंहितेचा अवमान न होता हा शिवस्वराज्य दिन साजरा व्हावा अशी अपेक्षा कनिष्क कांबळे यांनी व्यक्त केली.

सरकारच्या सर्व कचेऱ्यांवर फक्त आणि फक्त भारतीय तिरंगा ध्वजच फडकविण्यात यावा, धार्मिक ध्वज फडकविल्यास भविष्यात धार्मिक तेढ निर्माण होऊन सांप्रदायिक वाद निर्माण होऊ शकतो, देशातील एकता व अखंडता मोडीत येऊन राष्ट्रीय एकत्मतेला तडा जाऊ शकतो.
राष्ट्रध्वज संहितेचे पालन करून भगव्या ध्वजा ऐवजी तिरंगा ध्वजच सरकारी कचेरीवर फडकवावा या पक्षाच्या भूमिकेशी आम्ही रिपब्लिकन्स ठाम असल्याचे मनोगत राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.