प्रथमताच अल्पसंख्याक समाजातील औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती शिक्षण क्षेत्रात
रावेर (शरीफ शेख)
महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य अशी जळगाव येथील स्वातंत्र्य पूर्वीची अंजुमन तालीमुल मुस्लिमीन अर्थातच एटीएम या संस्थेच्या अध्यक्षपदी जळगाव येथील औद्योगिक क्षेत्रातील कार्यरत व्यवसायिक तथा औद्योगिक क्षेत्रात विविध संघटना मध्ये कार्यरत असलेले इंजिनीयर एजाज रज्जाक मलिक यांची सर्वानुमते निवड झाल्याने त्यांच्या घरी जाऊन जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी युवा मंच तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ ,शाल व अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यांत आले.त्या वेळी त्यांचे लहान बंधू फैसल मलिक व काका रहीम मलिक यांची उपस्थिती होती.

*एजाज मलिक यांचे औद्योगिक संघटन कार्यक्षेत्र*
अभियांत्रिक पदवीधारक असलेले एजाज मलिक १९९४ पासून उद्योग व्यवसाय सांभाळत आहे, जळगाव इंडस्ट्रीयल युथ असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य, ह्युमन राईट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा कौटुंबिक सार्वजनिक विश्वस्त संस्था अब्दुल रज्जाक चॅरीटेबल ट्रस्ट चे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहे
तसेच क्रिसेंट एज्युकेशनल सोसायटीचे सचिव म्हणून त्यांना अनुभव आहे.
*मानियार बिरादरीचे युवा मंच तर्फे सत्कार*
मन्यार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात जळगाव शहराध्यक्ष सय्यद चाँद यांच्या मार्गदर्शनाखाली मन्यार बिरादरीचे युवा कार्यकर्ते अब्दुल रऊफ, अख्तर शेख, जावेद सैयद, साजिद सैयद,सलीम शेख, साबिर सय्यद, सलीम शेख, ताहेर शेख, हारून मेहबूब, आदींची उपस्थिती होती.
*अभिनंदन पत्रात उल्लेख*
तरुण,अभियांत्रिकी पदवीधर, उद्योजक असल्याने खान्देश ची मदर इन्स्टिट्यूट ची 21 व्या शतकात मोठी झेप घ्या व पारदर्शकता ठेऊन तरुणांना सोबत घेऊन वारिष्टाच्या मार्गदर्शना खाली प्रगती करा हा मुकुट काटेरी असून त्यातून अल्लाह च्या कृपेने मार्ग काढणार अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

