
काका सोबत नव विवाहित तरुणी गेली पळून ,
अमीन शाह
: आई वडिलांनी इच्छे विरोधात लग्न लावून दिल्याने नवविवाहित तरुणीने लग्नाच्या सहाव्याच दिवशी सासुरवाडीतून पळ काढला आहे . आणि नात्यात काका लागत असलेल्या युवकाशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला . सासुरवाडीतुन पळून आलेली तरुणी सरळ प्रियकरा कडे पोहोचली . प्रकरण पोलिसात गेल्यावर पोलिसांनी आणि माहेर व सासरच्या मंडळीने तिला संमजविण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती . घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आहे . एका तरुणाशी या तरुणीचा २५ मे रोजी विवाह झाला . लग्नानंतर काही दिवस ती सासरवाडीत राहिली . १ जूनला घरी कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली . सासरच्या व नातेवाइकांनी शोध घेऊनही तरुणी मिळून न आल्याने अखेर २ जूनला जामनेर पोलिसात ती तरुणी हरविल्याची तक्रार देण्यात आली . त्या नंतर पोलीस विभागाने तपास सुरू केला जातांना तिच्या जवळ असलेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून व तिच्या मामाशी झालेल्या संपर्क वरून पळून गेलेली तरुणी व तिचा काका उल्हासनगर येथे असल्याचे पोलिसांना समजले . त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर दोघे पोलिसांसमोर हजर झाले त्यानंतर पळून गेलेल्या तरुणीच्या माहेरचे व सासरचे देखील पोलीस ठाण्यात पहोचले .व तिला समजविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला . ती सज्ञान असल्याने पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला . तिच्या पतीने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला व ती त्याचा प्रियकर असलेल्या काकासोबत निघून गेली . काकांशी आपले गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रेम सम्बन्ध असल्याचे तिने पोलिसांसमोर सांगितले . पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे , हवालदार रामदास कुंभार व किशोर परदेशी यांनी या प्रकरणाचा तपास केला , परिसरात या प्रेम प्रकरणाची चर्चा केली जात आहे ,
फोटो सौजन्य , गुगल