
देवानंद जाधव
यवतमाळ – आज दि.05/06/2021 रोज शनिवारला जागतिक पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून मौजा नाकापार्डी ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच यांनी पर्यावरणातील बदला मुळे तसेच कोरोना आजार रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत आहे,या मागचे कारण वृक्ष तोंडी मुळे वातावरनात बराच बदल घडल्याने अनेक आजार निर्माण होत आहे.आशा आजारा वर मात करण्या करीता व आरोग्य चांगले रहावे या करीता वृक्ष लागवड करून वातावरण चांगले राहील वृक्षारोपणाचे असे महत्व पटवून दिले.
तसेच जून महिन्यात गावातील प्रत्येक कुटुंबाने कमीत कमी 1 झाड आपल्या घरीच लावण्याचे आव्हान केले.पर्यावरण दिन व वृक्षारोपण करण्या करीता गावातील सरपंच श्री.प्रेमराज धुर्वे,उपसरपंच सौ.प्रतिक्षाताई भावरे,सदस्य श्री. मेघश्याम भावरे,श्री.सतीश राऊत,सदस्या सौ.गौकर्णा मेश्राम, सौ.नलिनीताई मडावी,सौ.रेखा राऊत
झेप ग्रामसंघाचे कॅडर व पशुसखी व आय.सी.आर.पी.चे पदअधिकारी सौ.सुनीता कुमरे,शारदा व.येडमे,सौ.वंदना पु.सोनवणे,सौ.रंजना र.भवरे,सौ.अंजनाबाई व.कुळसंगे,आरोग्य सेवक श्री. बी.एम.पराते तसेच वन विभागाचे वनपाल श्री.आकरे साहेब,गावातील जनसेवक श्री. शुभम गुप्ता,श्री.अशोक कोयरे,श्री.प्रवीण पुसनाके,ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुरेश शिडाम,श्री. धनराज कडाके,रोजगार सेवक मयूर तिवारी इत्यादी उपस्थित होते.