Home विदर्भ कार अपघातात मंडळ अधिकारी जागीच गतप्राण, दोन जण गंभीर,एक किरकोळ जखमी

कार अपघातात मंडळ अधिकारी जागीच गतप्राण, दोन जण गंभीर,एक किरकोळ जखमी

851
0

दहेगाव(गावंडे) शिवारातील घटना,

वर्धा जिल्हा दहेगाव गावंडे शिवारात वळणरस्त्याच्या पुलावर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली यामध्ये १जण जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले,तर एक किरकोळ जखमी झाला,सदर घटना शुक्रवारी रात्री ९ , ४५ वाजता घडली

पोलीस सूत्रानुसार एम,एच,०५ ए एस ५४६५ क्रमांकाच्या चारचाकी कार नि चौघे जण वायफड कडून दहेगाव कडे येत होते, उषाबाई दाते यांच्या शेताजवळ वळण मार्गावरील नाल्याच्या पुलावर कार अनियंत्रित झाली व पुलाखाली पडली यामध्ये कार चालक मंडळ अधिकारी बाबाराव हिम्मतराव पांडे ५६ जागीच ठार झाले, सुनील नारायण घोडे व सुयोग ओमप्रकाश कांबळे हे दोघे गंभीर जखमी झालेत तर मोहम्मद शफी शेख इसुफ किरकोळ जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच सावंगी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला, गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.

Previous articleघनसावंगी तालुक्यातील अंधांना ‘प्रहार’ चा आधार
Next articleजागतिक पर्यावरण दिन विशेष…..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.