
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील अंध गरजू व्यक्तीना नुकतेच अन्नधान्य व किराणा किट चे वाटप करण्यात आले . लॉक डाऊन मूळे अंध व्यक्तीचे हाल होत आहेत त्यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे अशी बातमी वृत्तपत्रा मध्ये अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण व उपाध्यक्ष अनिरुध्द म्हस्के यांनी प्रसारित केली होती याची दखल घेत बच्चूभाऊ कडू यांचे स्विय सहायक संतोष राजगुरू व त्यांच्या टीमने हे अंध लोकांना मदतीचे कार्य हाती घेतले. राजगुरू सरांचे हे कार्य सर्व जिल्ह्यात सुरू आहे. त्याअगोदर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे हार व फुले वाहून सर्वांनी अभिवादन केले,व नंतर अंध बांधवाना अन्नधान्य व किराणा वाटप चा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम काळे ,राजपूत ,बालाजी माने,शाफिक शेख, हे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण,उपाध्यक्ष अनिरुध्द म्हस्के,तालुका अध्यक्ष विष्णू मीठे,महादेव शिंदे,तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष महादेव थुटे, अंबड तालुका अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, अमजद खान पठाण,कांताराम वाहुले,गजू रोडगे,सतीश राखुडे इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.