
बुलडाणा तालुक्यातील घटना ,
अमीन शाह ,
नराधम बापाने आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करून पीडितेला विष पाजले .माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बुलडाणा तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणी नराधम राक्षस बापा विरुद्ध रायपूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुलडाणा तालुक्यातील एका गावातील 41 वर्षीय बापाने आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत 27 मे च्या सायंकाळी राहत्या घरी मुलगी एकटी असतांना तीच्या सोबत लैंगिक अत्याचार केला आहे व घडलेली घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण केली . नराधम बाप इतक्यावरच ना थांबता पीडितेनी या अत्याचाराचा प्रतिकार केला असता आरोपी पित्याने तिला विषारी औषध पाजले .या घटने नंतर पिडीत मुलीला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . या घटनेची माहिती रायपूर पोलिसाना मिळाल्यानंतर ठाणेदार सुभाष दुधाळ हे दुपारी एका पोलीस अधिकाऱ्या सोबत बुलडाणा सामान्य रुगणालयात पोहोचले व पीडितेचा बयान नोंदविला .या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात 30 मेच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास आरोपी पित्या विरुद्ध बलात्कार , पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली असून . आज 31 मे रोजी आरोपी पित्याला बुलडाणा न्यायालयात हजर केले असता त्याची पुढील दोन दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेंद्र मोरे तपास करत आहे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटने मूळे समाजमन हेलावून गेला आहे ,