Home नांदेड शेतकऱ्यांनी दिले कृष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी विरोधात ३ जून जनआंदोलनाचा...

शेतकऱ्यांनी दिले कृष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी विरोधात ३ जून जनआंदोलनाचा करण्याचा इशारा

240
0

राजेश एन भांगे

नांदेड जिल्हा नायागाव तालुक्यातील कुष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी विरोधात सकाळी ११ वाजता, ३ जून २०२१,गुरुवारी रोजी कंपनी गेट समोर शेतकरी जनआंदोलन होणार आहे.
आज उपस्थित असलेल्या प्रतिनिधी शेतकऱ्यांनी दिला इशारा.

कुष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी कडे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल सोयाबीन, हळद,हरबरा ,मका विक्री केला .गेल्या सहा महिण्यापासून शेतकऱ्यांना रक्कम देत नाही,कंपनी शेतकऱ्यांना योग्य,सत्य माहिती देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती तयार झाली. शेतकऱ्यांची पेरणी जवळ आली तरी पैसे भेटत नसल्यामुळे चिंतेत आहेत आहे.

आपल्या हक्काचे पैसे कसे मिळवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी आज प्रतिनिधी शेतकरी उपस्थित होते ही बैठक कंपनीच्या गेट समोर भर उन्हात घेण्यात आली.या बैठकीत कंपनी विरोधात गुन्हा दाखल न करता रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले आहे. कंपनीच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आले, मालकांवर दबाव तयार करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करणे हा उद्देश आहे.यावेळी कंपनी व्यवस्थापक कडे शेतकऱ्यांनी प्रमुख मागणी केली की,किती शेतकऱ्यांची बाकी देने आहे जाहीर करावे व रक्कम कधी देणार लेखी द्यावे ही मागणी कंपनी मान्य केली नाही.कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्याशी स्पीकर फोन वर शेतकऱ्यांनी बोलेले तेव्हा त्यानी शेतकऱ्यांचे समाधान करू शकले नाहीत,फक्त उडवा-उडवीचे उत्तरे देत होते व गोड गोड बोलून असत्य बोलत होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे.
तरी या विरोधात आंदोलन करण्याचे ठरले आहे.

त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ३ जून रोजी भाकर -भाजी घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ.सुरेश कदम,किसान ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष डॉ.दत्ता मोरे,रयत क्रांती संघटना युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,रयत क्रांती संघटना नायगाव तालुका अध्यक्ष शहाजी कदम, गंगाधर कुलकर्णी, दत्ताहरी हिवराळे,आनंद माने, मधुकर ताटे ,व्यंकट कदम,जीवन श्रीसागर व अनेक शेतकरी उपस्थित होते.अशी माहिती सुत्रांकडून मार्फत कळविण्यात आली.

Previous articleवाह रे बाप , जन्मदात्या बापाने मुलीवर अत्याचार करून त्यास विष पाजले ,
Next articleमालकीच्या झोपड्या तोंडुनही परिशिष्ट-२ मध्ये नावे नाहीत.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.