Home मुंबई मालकीच्या झोपड्या तोंडुनही परिशिष्ट-२ मध्ये नावे नाहीत.

मालकीच्या झोपड्या तोंडुनही परिशिष्ट-२ मध्ये नावे नाहीत.

192
0

विमल शहा, मुरजी पटेल व प्रकल्प अधिकाऱ्याचा काळाबाजार

मुंबई  , प्रतिनिधी) गरीब झोपडीवाशीयांनी स्वतःच्या मालकीच्या झोपड्या तोडूनही भ्रष्ट प्रकल्प अधिकारी, विकासक महाठग विमल शहा व महादलाल मुरजी पटेल यांच्या संगनमताने आजही मूळ झोपडीवाशीयांची नावे परिशिष्ट-२ मध्ये समाविष्ठ केली नाही.

गोर गरीब लोकांच्या झोपड्या तोंडुनही विकासकाने त्यांना आजही पात्र केले नाही, अश्या बेघर झालेल्यांनी वारंवार सहकार विभागात तक्रारी देऊनही कोणतीच दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. याच त्रस्त नागरिकांनी आता रिपाई डेमोक्रॅटिक धाव घेतली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अश्या भ्रष्ट प्रकल्पातील भ्रष्टाचार मोडीत काढून बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्यामुळे विद्रोही पत्रकार पँथर डॉ राजन माकणीकर यांच्या माध्यमातून सत्य प्रकरणाला वाचा फुटावी म्हणून शेकडो पीडितांना रिपाई डेमोक्रॅटिक कडे धाव घेतली आहे.

उच्चशिक्षीत पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशा वरून कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या सह डॉ. माकणीकर, विधिज्ञ सेल महाराष्ट्र राज्याध्यक्ष ऍड तुषार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ अनुभवी वकिलांची टीम घेऊन राज्यासह मुंबईतील भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचे काम युद्धपातळीवर चालवले आहे.

बृहनमुंबई के पूर्व चे संबंधित प्रकल्प अधिकारी विकासकांच्या इशाऱ्यावर परिशिष्ट बनवून बोगस सदनिका पात्र करून देत आहेत, तसेच इमारत क्रमांक ९ मध्ये विकासक व सोसायटी पदाधिकारी यांनी अपात्र सदनिका बळकावल्या आहेत.

हरी नगर, शिवाजी नगर प्रकल्पातील सर्व भ्रष्टाचार उघडकीस करून महादलाल महाचोर मुरजी कांजी पटेल याचे आमदारकीचे स्वप्न धुळीस मिळवुन फ्रॉड मुरजी पटेल सह संबंधित अधिकारी विमल शहाला जेरबंद करून मूलझोपडी धारकांना सदनिका मिळवून देण्याचा संकल्प पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.

Previous articleशेतकऱ्यांनी दिले कृष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी विरोधात ३ जून जनआंदोलनाचा करण्याचा इशारा
Next articleखा. छत्रपती संभाजीराजे यांनी नव्या पक्षाचा विचार न करता रिपाई डेमोक्रॅटिक सोबत मिळून नेतृत्व करावे.:- डॉ. राजन माकणीकर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.