Home बुलडाणा चिखली शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान

चिखली शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान

550
0

 

आमदार शवेताताई महाले पाटील यांनी केली तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी ,

योगेश शर्मा जी ,

चिखली, : शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. यातच दिनांक २९ मे शनिवार रोजी दुपारी आकाशात काळे ढग भरून आले असल्याने परिसरात पाऊस येण्याची शक्यता वाटत असतानाच दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात विजांच्या कडकडाटासह जवळपास १ तास पेक्षा अधिक वेळ जोरदार पाऊस विजेच्या आणि वाऱ्यासह कोसळला. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी पेक्षा अधिक असल्याचे मत जाणकारांनी सांगितले.
जवळपास तासभर पेक्षा अधिक काळ झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन काही काळ त्रस्त करून सोडले होते. यावेळी पोलिस स्टेशन परिसरातील काही झाडे वाऱ्याने रस्त्यावर आडवी पडली तर जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अनेक ठिकाणी उडून पडल्या. हा पाऊस काही तासात बंद झाला मात्र शहरात पूर्णपणे विद्दुत पुरवठा खंडित झाल्याने लोकांना याचा जास्त त्रास होतांना दिसून आले, तर वीज पुरवठा कधी सुरू होणार ? याबाबत शहरवाशी स्थानिक विद्दुत विभागातील लोकांना फोन करून याबाबत विचारणा करत असतांना ठिकठिकाणी तुटलेली विद्दुत तार आणि तुटलेल्या झाडांनामुळे झालेल्या नुकसानला दूर करण्यासाठी फिल्डवर प्रयत्न करत असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वेळेवर संपर्क होत नसल्याने कामात अजून उशीर होत असल्याची खंत अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. तर विद्दुत पुरवठा कधी पर्यंत सुरू होणार ? याबाबत सध्या अधिकारी स्वतः सुद्धा काही बोलू शकत नसल्याने शहरवासीयांनी शांतता व संयमता बाळगण्याचे आम्ही सुद्धा आवाहन करत आहोत.

 

 

खंडित झालेल्या विद्दुत पुरवठा बाबत सहाय्यक अभियंता ए. बी. भुसारी यांनी सांगितले की, ठिकठिकाणी झाडे कोसळली असून विजेचे तार अनेक ठिकाणी तुटली आहेत आणि सध्या वेगाने त्याला दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे, यातच अनेक तासांपासून वीज पुरवठा बंद असल्याने साहजिकच लाईन कधी येणार याकरिता लोकांचे आम्हाला सारखे फोन येत आहे. परंतु यावेळी ठिकठिकाणी आमचे लोक काम करत असून सारखे त्यांच्या सोबत कामाच्या बाबतीत अपडेट घ्यावे लागते आणि आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी फिल्डवर असल्याने मोबाईल चार्ज सुद्धा करणे कठीण आहे. यावेळी लोकांनी संयमता बाळगून आम्हाला साथ द्यावी, जेणेकरून आम्ही रात्रभरात काम पूर्णत्वास नेऊ, खर तर काम कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत आम्ही सध्या काहीच सांगू शकत नाही. पावसामुळं अनेक ठिकाणी झाडे कोसळून विजेचे तार तुटली आहेत. अश्या घटना अनेक ठिकाणी झाल्या असून सध्या चिखलीसह देऊळगाव राजा येथील कर्मचारी सुद्धा चिखलीत येऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या मेहनत घेत असून हे काम लवकरच पूर्ण होईल, अश्यात लोकांनी मात्र धीर धरून राहावे, कारण हे आस्मानी संकट असल्याने नेमके नुकसान किती ठिकाणी झाले याबाबत सध्या आम्ही काहीच सांगू शकत नाही, त्यामुळे शक्यतो आमच्या मोबाईलवर विचारपूस करण्यासाठी फोन करता ऑफिसमधील लैंडलाईन नंबरवर संपर्क करा, आमचे मोबाईल जर बंद पडले तर अनेक ठिकाणी काम करत असलेले आमच्या लोकांमध्ये आणि आमच्यात वेळेवर संपर्क होणार नाही अशी माहिती चिखलीचे सहाय्यक अभियंता ए. बी. भुसारी यांनी दिली आहे..

Previous articleअंगणवाडी चा पोषण ट्रॅकर अँप तात्काळ मराठीत उपलब्ध करा – मनसेचे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन….
Next articleभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.