Home रायगड माथेरानमध्ये मालवाहू घोड्यांचे शोषण! प्रशासनाचे दुर्लक्ष…!

माथेरानमध्ये मालवाहू घोड्यांचे शोषण! प्रशासनाचे दुर्लक्ष…!

165
0

कर्जत: जयेश जाधव

तालुक्यातील माथेरान हे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित आहे. बहुतांश पर्यटक वेगवेगळ्या पाॅईंट पाहण्यासाठी व फिरण्यासाठी घोड्यावरून सवारी करीत असतात याशिवाय माथेरान मध्ये माल वाहतुकी साठी घोड्यांचा सर्रास वापर होतोय. परंतु त्यांच्या हालअपेष्टा यातना सहन कराव्या लागतात हे पाहवत नाहीत. ह्या माल वाहतूक घोड्यान करिता कुणालाच दया,प्रेम येत नाही. माथेरान मधील घोडे उपाशी राहू नये म्हणून लाॅकडाऊन परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्तींनी त्यांच्या खाण्या करिता मोफत भुसा वाटप केलेला आहे. तर दुसरीकडे या माल वाहतुकीच्या घोड्यांचा निर्दयीपणे माल आणण्यासाठी उपयोग केला जात आहे.त्यातच अशक्त, वयस्कर, जखमी झालेले घोड्यावरुन माल आणू नये जखमी घोड्याना योग्य औषधोपचार करून तंदुरुस्त झाल्यावरच त्यांना कामालाच जुपावे.या घोड्यावर माल किती किलो असावा या बाबत प्रशांसनाने काही नियम बनवावे. त्या घोड्याच्या ताकदी पेक्षा त्याच्यावर माल चढवल्यास तो घोडा मध्येच बसतो. त्या स्थितीत ही त्याला काठ्या मारून उठवून तसेच सरपटत तो माल पोचवला जातो. त्यामुळे अशक्त, वयस्कर, जखमी घोड्यानवरून माल नेऊ नये. त्यांना भुसा, पाणी वेळेत द्यायला पाहिजे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व या मालवाहतूक घोड्यांच्या हाल अपेष्टा थांबवाव्यात.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत कदम यांनी केली आहे.
तर पुर्वी संपूर्ण शहरात मालवाहतूक करणाऱ्या घोड्यांची संख्या जेमतेम 150 ते 200 होती तिचं घोड्यांची संख्या आता 400 ते 450 वर पोहचली आहे.मालवाहतुकीत व्यवसायात नवख्या असणाऱ्या मालवाहतुकदारांकडून जास्त पैसे कमावण्याची या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात घोड्यांचे हाल करून शोषण केले जात आहे.या संदर्भात अनेक प्रकार समोर येऊन देखील येथील स्थानिक प्रशासन तसेच माथेरान पोलीस खाते देखील बघ्याच्या भुमिकेत आहे.मालवाहतुक घोड्यांच्या संख्येवर मर्यादा न आणल्यास घोड्यांची वाढलेली संख्या माथेरानकरांसाठी डोके दुखी ठरू शकते. यामुळे शहराच्या प्रवेशद्वाराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण होऊन येथील परंपरागत व्यवसाय करत असलेल्या पर्यटकांना सवारी देणाऱ्या घोड्यांच्या आणि येथील नागरिकांच्या आरोग्याला देखील भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो अशी देखील भिती व्यक्त केली जात आहे.