Home मराठवाडा आशा,गटप्रवर्तकांचा प्रलंबित प्रश्न आणि मागण्यांसाठी ‘सिटू’ च्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक संप –...

आशा,गटप्रवर्तकांचा प्रलंबित प्रश्न आणि मागण्यांसाठी ‘सिटू’ च्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक संप – नेत्रदीपा पाटील

371

राज्यातील आशा स्वयंसेविकांना आणि गटप्रवर्तक यांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांसाठी सेंट्रल आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न ( सिटू ) च्या वतीने सोमवारी ,२४ मे रोजी देशव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक फेडरेशनच्या सहसचिव नेत्रदीपा पाटील यांनी दिली.

जालना- लक्ष्मण बिलोरे

सार्वजनिक आरोग्य विभाग,प्रधान सचिव, आयुक्त यांच्यासह विविध विभागांत दिलेल्या निवेदनात नेत्रदीपा पाटील यांनी म्हटले आहे की,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आशा प्रवर्तक अत्यंत असुरक्षित स्थितीत काम करत आहेत.ग्रामपंचायत,नगर पंचायत,नगर परिषद, महानगर पालिका यांच्या वतीने प्रोत्साहनपर भत्ता मिळावा यासाठी सतत पाठपुरावा करावा लागत आहे.कोरोना महामारिच्या काळात आशांना बेशिक सुरक्षा जसे कि मास्क, सॅनिटायझर,हॅंडग्लोज ,किट वगैरे मिळत नाहीत, सध्या कोरोना काळात लसिकरण सत्र सुरू आहे.शासन लसिकरण भत्ताही देत नाही या व अन्य मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आशा प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी सिटूच्या वतीने एकदिवशीय लाक्षणिक संप पुकारला आहे.यावरही शासनाने लक्ष न दिल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर काॅ.राज्याध्यक्ष आनंदी अवघडे , सहसचिव नेत्रदीपा पाटील,पुष्पा पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.