Home मुंबई करुणा धंनजय मुंडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयास भेट

करुणा धंनजय मुंडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयास भेट

630

मुंबई ,  {प्रतिनिधी} –  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी तथा जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ. करुणा धनंजय मुंडे यांनी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रूग्णालय कांदिवली पश्चिम मुंबई येथे अति दक्षता विभागात दाखल असलेले आंबेडकरी चळवळीतील आंदोलनकारी युवा नेतृत्व असलेला चेहरा रोखठोक पत्रकार व आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचे वडील शिवाजी वाघमारे यांना अचानक श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्या छातीत दुखू  लागल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले , 

असून त्यांच्या औषोधोपचारा ची माहिती व तब्बेतीची काळजीवाहू  भेट घेण्यासाठी आल्या होत्या यावेळी रुग्णालयाच्या डीन प्रतिभा पाटील व वरिष्ठ वैधकीय अधिकारी अजय गुप्ता रजेवर असल्या कारणाने रुग्णालयाच्या एम ओ डॉ.मोरे यांच्याशी भेट झाली असता रुग्ण शिवाजी वाघमारे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली असता त्याना आता बरे वाटत असून काळजी करण्याचं कारण नाही त्यांच्या ऑक्सिजन लेव्हल 96 अशी असून ते लवकरच बरे होतील असा आशावाद डॉ.मोरे यांनी व्यक्त केला असून या भेटी दरम्यान रुग्णालयातील इतर कोरोना रुग्णांच्या नातेवाई काकडून त्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच सफाई कामगार सुरक्षा रक्षक यांच्या सुद्धा अडचणी सोडविण्यात येतील या बाबत संबंधित अधिकाऱयांची भेट घेऊन सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन करुणा धंनजय मुंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिले यावेळी त्यांच्या समवेत आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे .जीवनज्योत सामाजिक सेवा संस्थे चे प्रमूख रवी गवळी कुलदीप विश्वकर्मा धडक कामगार युनियन चे मुंबई उपाध्यक्ष महेश गुप्ता राजु हिवाळे उपस्थित होते.