Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 24 तासात 245 पॉझेटिव्हसह 416 कोरोनामुक्त तर एकूण सहा मृत्यु

यवतमाळ जिल्हात 24 तासात 245 पॉझेटिव्हसह 416 कोरोनामुक्त तर एकूण सहा मृत्यु

133
0

 जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1494 बेड उपलब्ध

            यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात 245 जण पॉझेटिव्ह तर 416 जण कोरोनामुक्त झाले असून सहा जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. 

            जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 5278 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 245जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5033 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2884 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1547 तर गृह विलगीकरणात 1337 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70954 झाली आहे. 24 तासात 416 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 66349 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1721 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.11, मृत्युदर 2.43 आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 70 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 46 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात पांढरकवडा येथील 60 वर्षीय पुरुष व यवतमाळ येथील 32 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

            सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 245 जणांमध्ये 152 पुरुष आणि 93 महिला आहेत. यात वणी येथील 59 रुग्ण पॉझेटिव्ह, दिग्रस 39, दारव्हा 32, पांढरकवडा 27, यवतमाळ 25, आर्णि 13, बाभुळगाव 11, घाटंजी 11, राळेगाव 6, झरीजामणी 6, नेर 5, महागाव 5, मारेगाव 3, पुसद 1, उमरखेड 1 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत 585950 नमुने पाठविले असून यापैकी 584263 प्राप्त तर 1687 अप्राप्त आहेत. तसेच 513309 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1448 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 785 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1494 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 219 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 358 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 155 रुग्णांसाठी उपयोगात, 371 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 411 उपयोगात तर 765 बेड शिल्लक आहेत.