Home बुलडाणा रमजान ईद साधेपणाने साजरी करावी , सरपंच दाऊद सेठ कुरेशी ,

रमजान ईद साधेपणाने साजरी करावी , सरपंच दाऊद सेठ कुरेशी ,

265
0

 

 

अमीन शाह

बुलडाणा ,

गेल्या वर्षापासून आपल्या देशासह जगभरात कोरोना विषाणू या महामारीने थैमान घातले असून आता पर्यंत या महामारीत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत . करोना चा प्रकोप वाढत असल्या मुळे सर्व व्यापार ठप्प झाले आहेत गरीब व्यापाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून हातावर पोट असणाऱ्या गरीब मजूरांच्या हाती काम नाही त्या मुळे त्यांचे एक वेळ च्या जेवणासाठी हाल होत आहे . अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी नेहमीच लोकांच्या कामी येण्याची व सहकार्य करण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे.यंदा ही रमजान ईद सर्वत्र साजरी केली जाणार आहे यात करोना चा प्रकोप पाहता राज्यभरात शासनाने कडक निर्बंध लावले आहेत तसेच बुलडाणा जिल्ह्यात ही
सर्व दुकाने बाजारपेठ बंद असून प्रशासनामार्फत लोकांना घरी रहाण्या विषयी व कोरोना विषाणू वर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे
शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुनच पवित्र ईद साजरा करावि . ईदच्या ख़रीदी साठी दुकानावर जाऊ नये , तसेच नमाजासाठी पठन करण्यासाठी गर्दी करु नये , नमाज़ पठन करतांना सोशल डिसटनसिंगचे पालन करावे , मास्कचे वापर करावे . हस्तांदोलन व गळाभेटी ना करता सुरक्षित अंतर ठेवुनच ईदच्या शुभेच्छा द्याव्यात . जिवन आणि आरोग्य हे एक धार्मिक कर्तव्य असुन संसर्ग टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करने काळाची गरज आहे
प्रशासनाच्या वतीने शासनाने निर्गमित केलेल्या विविध आदेशांची अंमलबजावणी करण्या विषयी सूचना देण्यात येत आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांनी गेल्यावर्षी सारख्या या वर्षीसुद्धा रमजान ईद घरीच राहून अत्यंत साधेपणाने साजरी करावी ईदची नमाज आपल्या घरीच पठन करावी तसेच लॉकडाउन मुळे गोर – गरीब लोकांचे अत्यंत हाल होत आहे या लोकांना मदत करावी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करावी तसेच कोणीही उपाशी राहू नये यासाठी सर्वांनी गोरगरीब लोकांमध्ये अन्न धान्य किराणा वस्तू जीवनावश्यक वस्तू चे वाटप करावे सर्वांची ईद गोळ करण्याचे प्रयत्न करावे असे आव्हान साखरखेर्डा येथील कर्तवयदक्ष सरपंच दाऊद सेठ कुरेशी यांनी केले आहे .