सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. १९ :- जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील श्री. बि. के. समाजकार्य देवळी येथील महाविद्यालयाच्या MSW भाग दोन च्या विद्यार्थ्यांचा 7 जानेवारी ते 15 जानेवारी 7 दिवसीय ग्रामीण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची थीम “संविधान साक्षरता अभियान” अशी होती. सात दिवसामध्ये काजळसरा गावामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबविले.
गावकर्यांयचा सहभाग घेऊन शोषखड्डे खोदले, गावातील रांगोळी कौशल्य विकसित करण्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. वेगवेगळ्या समस्यांवरती गावातील महिलांनी संदेश देणारी रांगोळी काढल्या. संविधान दिंडी काढून संविधांनातील मूलभूत अधिकार नितिंनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य यांची जाणीव करून दिली. वृक्ष दिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा रास व दुष्परिणाम दिंडीच्या माध्यमातून गावातील लोकांना शिबिराथ्यांनी संगितले. शासनाचा स्वच्छता अभियान देखील शिबिरार्थीनी राबविले. स्वच्छतेचे महत्व लोकांना संगितले सर्व गाव झाडून घरा समोरील परिसर शिबिरार्थीनी रांगोळी काढल्या रोज सकाळी प्रभात फेरीच्या माध्यमातून विविध समस्यावरती, शेतकरी आत्महत्या, वृद्धांच्या समस्या, पर्यावरणाची समस्या, पाण्याची समस्या, अंधश्रद्धा, कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, स्वच्छता, मतदान जनजागृती पथनाट्यदवारे विविध समस्यांवरती गीते, भजने, घोषवाक्य यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये “ संविधान मूलभूत कर्तव्य”, “ Legar Awareness for Social work”, संविधानाची प्रस्ताविका, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला साक्षमीकरण, स्व-समुपदेशन, बालहक्क व संरक्षण, आभासी युग व आजचा युवक, व्यक्तिमत्व विकासात शिक्षणाचे महत्व, मानसिक आरोग्य विषयक मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता आणि सामाजिक प्रबोधन इत्यादि विषयांवरती तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केल्या गेले. सायंकाळी 7.30 ते 10.00 पर्यन्त शिबिरार्थीनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमामध्ये गावातील लहान मुलांचे कौशल्य, कला-गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना डांस, कविता करण्यासाठी स्टेज उपलब्ध करून दिले. शिबिरार्थी यांनी देखील विविध समस्यांवरती पथनाट्य, डांस, कविता, राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली. समारोपिय कार्यक्रमाला गावच्या सरपंच सौ. मा. सिंघुताई ठाकरे होत्या त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषांनामध्ये शिबिरार्थीचा शब्द सुमनाने गौरव केला व पुढील वर्षी आमच्याच गावामध्ये शिबीर ध्यावा असे उद्गार काढले. प्रमुख पाहुणे श्री. बि. के. समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. प्रितम खडसे, कार्यकारी प्राचार्य सुनील सुर्वे, पोलिस पाटील दिनेश जवादे, तंटाध्यक्ष भास्करराव ठाकरे, विक्की बिजवर, मिलिंद शिळाणे हे होते.
सुनील सुर्वे यांनी आपल्या भाषणात केलेल्या कार्याबद्दल शिबिरार्थीचे कौतुक केले कोण – कोणती कार्य केली व त्यांची सध्यास्थितीत काय गरज आहे हे सांगितले. या सात दिवसीय निवासी ग्रामीण शिबिर प्रमुख प्रा. अंकित गिरमकार यांनी सात दिवस सहकार्य करणार्याय गावकर्यांिचे व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणार्यांिचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MSW चे विद्यार्थी निलेश दारुंडे व तृप्ती अमृतकर यांनी केले.