Home पश्चिम महाराष्ट्र बंदोबस्ता साठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मित्र परीवार समन्वय समिती तर्फे चहा,नाश्ता

बंदोबस्ता साठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मित्र परीवार समन्वय समिती तर्फे चहा,नाश्ता

77
0

पोलीस मित्र समन्वय समितीचे अध्यक्ष मा.श्री.डाँ.संघपाल उमरे सर,महाराष्ट्र राज्य सचिव मा.विनोद पञे,व महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार मा.श्री.सुभाषदादा सोळंके सर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस विभागा साठी व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र भर सर्व पोलीस मित्र परीवार समितीचे पदधिकारी आपली जबाबदारी समजुन कार्यरत आहेत,

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-मा.हाजी अल्सम सैयद सर व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-सौ.माधुरीताई गुजराथी यांच्या व पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव-सौ प्रतिभा पाटील यांच्या संकल्पनेतुन व नेतृत्वाखाली इस्लामपूर सांगली रस्त्यावर आपले पोलीस बांधव आपले घर-दार सोडुन १२ ते २४ तास सतत आपल्या संरक्षणासाठी साठी कधी कोरोणा बंदोबस्त तरी सण उत्सव बंदोबस्तासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रत्यक्ष कर्तव्य बजावतांना उभे दिसत आहेत.या बाबत सौ प्रतिभा पाटिल पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव यांना या बाबत माहिती मिळताच स्वत: तिथे जाऊन पोलीस बाधवांची आरोग्या विषयी,व ईतर होत असलेल्या समस्या विषयी विचारपुस व सखोल चर्चा करुन त्यांचे साठी नास्ता व चहा उपलब्ध करून दिला.व लवकरच आपल्या समस्या विषयी वरिष्ठ पदधिकाऱ्यांशी व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचेशी लवकरच चर्चा करुन याबाबत काय करता येईल याची गंभिर दखल घेऊ असे मत सौ.प्रतिभाताई पाटिल यांनी या प्रसंगी व्यक्त केले.पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलीस मित्र परीवार समिती त्यांच्यासाठी करित असलेल्या कार्याचे व पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव सौ.प्रतिभाताई पाटिल यांचे या प्रसंगी अभिनंदन केले व या कार्याबद्दल समाधानही व्यक्त केले.पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांन साठी केलेल्या कार्याचे परिसरात कैतुक केले जात आहे .