Home बुलडाणा अखेर बुलढाणा समशान भूमीत त्या कोरोना रुग्णांचा अंतिम संस्कार,

अखेर बुलढाणा समशान भूमीत त्या कोरोना रुग्णांचा अंतिम संस्कार,

323
0

कोरोनाचा कहर शिगेला पोहचण्याच्या तयारीत

 

 

रयतचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील,शिवसेना नगरसेवक मोहन पऱ्हाड,केमिस्ट संघटनेचे स्वप्नील तायडे आले मदतीला धावून*

 

अमीन शाह

बुलढाणा : दि 17 रोजी बुलढाणा येथिल सिद्धिविनायक कोरोना हॉस्पिटलमध्ये कोरोना मुळे परप्रांतीय महिला रुग्णांचा मृत्यू झाला असता सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून गेले,
मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आलनुर या गावातील एक पन्नास वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असता सर्वात प्रथम त्या महिलेला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेड व रेमडीसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाला मुक्ताईनगर येथील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले परंतु त्याही ठिकाणी बेड व इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी चिखली येथील डॉ सुहास तायडे व डॉ योगिता तायडे यांच्याशी सँम्पर्क साधला असता त्यांनी बुलढाणा येथिल सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करून दिली, त्या ठिकाणी रुग्णाला लागणारे रेमडीसिव्हीयर इंजेक्शन रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पुढाकाराने केमिस्ट संघटनेचे चिखली शहराध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी तात्काळ उपलब्ध करून दिले,परंतु दुर्दैवाने सदर महिला रुगण कोरोनामुळे दगावली असता कोरोना रुग्णाचे मृत शरीर नगरपालिका हद्दीच्या बाहेर नेता येत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,बुलढाणा नगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक मोहन पऱ्हाड,चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी अंतिम संस्काराची तयारी करून स्वतः सरणं रचून त्या रुग्णाचा दफन विधी बुलढाणा येथील समशान भूमीत केला व सदर महिलेच्या मुलाला त्याच्या घरापर्यंत पोहचवून देण्याची व्यवस्था केली,अशी वेळ कोणावर ही येऊ नये म्हणून विना कारण फिरू नका मास्क सॅनिटायझर चा वापर करा ताप सर्दी डोकेदुखी अंगावर काढू नका तात्काळ उपचार घ्या असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले आहेhttps://youtu.be/9xGbhFew8tc