Home महाराष्ट्र सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य परीक्षा मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करावी प्रा , सचिन...

सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य परीक्षा मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करावी प्रा , सचिन काळबांडे

116
0

 

*विद्यार्थ्यासोबत दुजाभाव करु नये*

अमीन शाह

17 एप्रिल: शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांनी दहावी सीबीएसई बोर्डा च्या निर्णयाप्रमाने राज्य मंडळ दहावी बोर्डाची परिक्षा कोणताही दुजाभाव न करता तातडीने रदद् करण्यात यावी, अशी मागणी आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा सचिन काळबांडे यांनी केलेली आहे.
ज्याप्रमाणे सीबीएसई बोर्डाने दहावीची परिक्षेबद्दल रदद् करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे , परंतु याउलट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी 12 तारखेला सोशल मीडिया वर जून महिन्यात परीक्षा होईल ऎसे घोषित केले, त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्याची दिशाभूल करण्याचा व त्यांचे शैक्षणिक वर्ष धोख्यात आणनार असे वाटते,

*विद्यार्थ्याचे पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन कसे होणार*?

दहावी नंतर अकरावीत प्रवेश घेणे, नीट, जेईई , क्लासेस लावणे , एंट्रेंस परीक्षा ई. सर्व नियोजन सदर घोषनेने बिघडल्याने पालक नाराज आहेत,कारण जून महिन्यात परीक्षा होईल की नाही, हे सुद्धा कोरोना लाटेमुळे सांगता येत नाही.त्यामुळे पुढील शैक्षणिक नियोजन करने शक्य नाही.
त्यामुळे केंद्र व राज्य मंडळ वेगवेगळे निर्णय घेणे म्हणजेच कुठेतरी समन्वय नसने व विद्यार्थ्याची समस्या न समजता घेतलेला निर्णय मागे घेऊन केंद्र मंडळा प्रमाणे राज्याने लगेच विद्यार्थी हित लक्षात घेऊन व कुठलाच दुजाभाव होणार नाही ही बाब लक्षात घेऊन तातडीने दहावीची परीक्षा रद्द करावी। अशी मागणी काळबांडे यानी केलेली आहे.
सध्याची परिस्थिती राज्यात फारच चिंताजनक आहे व प्रत्येक पालक चिंतेत आहे आहे, लाखो परिवार कोरोना संक्रमनाने ग्रस्त आहेत, कित्येक परिवारातील जीव गेलेले आहेत, विद्यार्थी अनाथ झालेले आहेत, अश्या परिस्थितित खरच विद्यार्थी परीक्षा देतील काय? तसेच केंद्र मंडळ परीक्षा घेणार नाही व राज्य मंडळ परीक्षा घेणार हा एकाच वर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे.
दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमण खाजगी शाळा व शिक्षक यांचे आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. व कोरोना वेगाने पसरल्याने शासनाच्या उदासीन धोरणामुळे येणाऱ्या संकटाचा इशारा आरटीई फॉउंडेशन चे अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडे यांनी दिलेला आहे.
शिक्षणमंत्री यांनी तातडीने ह्याचा विचार करून सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परीक्षा रदद् करून वर्ग 1ते 11 प्रमाने प्रमोट करावे, परन्तु सध्याची परिस्थितीत परीक्षा घेणे ही मोठ्या प्रमाणात संक्रमण वाधन्यास मद्त होईल व जीवहानी सुद्धा होईल ह्याला कारणीभूत सरकार असेल,
ह्याप्रसंगी उपाध्यक्ष राम वंजारी, मुंबई शहर प्रमुख भरत मलिक ,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रेम शामनानी , प्रमुख पदाधिकारी तात्यासाहेब पंडितराव शिदे, निलेश पांडे, नितीन बिडकर, बाटू पाटिल, खुशाल सूर्यवंशी, नितिनजैन, उत्कर्ष पवार , वर्धा जिल्हा समन्वयक दिनेश चन्नावार, जिल्हाध्यक्ष नितिन वड़नारे ,पदाधिकारी पंकज चोरे ,भंडारा जिल्हा प्रमुख राजेश नंदापुरे , महेन्द्र वैद्य, शांतलवार ,चंद्रपूर जिल्हा प्रमुख प्रशांत हजबन , कोल्हापुर जिल्हा प्रमुख महेश पोळ व अनिता पाटील, सोलापूरचे हरीश शिंदे, औरंगाबादचे मेसाचे प्रल्हाद शिंदे , अहमदनगर चे देविदास घोडके अमरावती जिल्हा प्रमुख शोएब खाँन, वाशिम जिल्हा प्रमुख अभी देशमुख , नारे, उपस्थित होते.