Home पुणे मुलगी व्हाट्सएप वर बोलते म्हणून जन्मदात्या बापाने दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून...

मुलगी व्हाट्सएप वर बोलते म्हणून जन्मदात्या बापाने दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून चिरडले ,

771
0

 

बापाने ही ट्रक खाली केली आत्महत्या

अमीन शाह

: पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाने त्याच ट्रक खाली आत्महत्या केली आहे . ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली भरत भराटे असं निर्दयी मृत बापाचं नाव आहे . तर 18 वर्षीय नंदिनी आणि 14 वर्षीय वैष्णवी या दोन्ही मुलींची त्याने हत्या केलीये . या घटनेपूर्वी बापाने एक चिट्टीही लिहून ठेवली आहे . त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्ख कुटुंब संपवत असल्याचं लिहले आहे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील पण सध्या मावळ तालुक्यातील इंदोरी गावात भराटे कुटुंबीय राहत होते . इथेच ते एका छोट्याशा घरात राहत होते . घर गावापासून दूर असून तिथून शंभर मीटर अंतरावर नातेवाईकही राहतात . वडील ट्रक चालवायचे तर आई देखील लगतच एका ठिकाणी काम करायची . तीन मुली आहेत , मात्र कोरोनामुळे शाळांना सुट्टी असल्यानं त्या घरीच असतात
दुपारी मोठी मुलगी नंदिनी मोबाईलवर चॅटिंग करत होती . व्हॉट्सअॅपवर ती एका मुलाशी संवाद साधत असल्याचं तिच्या वडिलांनी पाहिले . तेव्हा भरतने मुलीला मारहाण केली . सायंकाळी सात वाजता मुलींची आई कामावरून आली , तेव्हा पुन्हा भांडणं झाली . मुलगी वाईट वळणावर कशी गेली यावरून बाप चिंतेत होता . रात्री सर्वांची जेवणं झाली , नंतर भरत एका कागदावर काहीतरी लिहित होता . आईने विचारले तर तिच्यावर तो डाफरला . नंतर त्याच कागदावर आईला जबरदस्तीने सही करायला सांगितलं … पती चिडलाय हे पाहून आईनेही सही केली . त्यानंतर साडेअकरा वाजता सगळे झोपी गेले . भरत काही वेळाने उठला आणि दोन मुलींना घेऊन घराबाहेर पडला . पण नेहमीप्रमाणे बाहेर वाहनं आहेत का हे पाहत असावा , त्यातच उन्हाळा असल्याने तो मध्यरात्री उठून बाहेर बसायचा . मुली ही कधीकधी सोबत असायच्या . तसंच यावेळी ही मुलींना तो बाहेर घेऊन गेला असावा असा आईचा समज झाला . पण काहीवेळाने ट्रकचा आवाज आला , म्हणून आई घराबाहेर आली . तेव्हा दोन्ही मुली रस्त्यावर झोपलेल्या आणि त्यांचा बाप ट्रकच्या स्टेरिंगवर दिसला . अहो , काय करताय असे आईने विचारलं . बापाने लहान मुलीसह तू ही इथे येऊन झोप , असं धमकावलंपण ती लहान मुलीला घेऊन तिथून लगत राहणाऱ्या नातेवाईकांच्या दिशेने धावली . नातेवाईकांना घेऊन तिथं पोहचेपर्यंत उशीर झाला होता . काही कळण्याआधी , दोन्ही मुली आणि पतीचा मृतदेह डोळ्यासमोर होता . सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी बचावल्या आहेत .. मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरू आहेत आणि ती व्हॉट्सअॅपवर त्या मुलाशी संवाद साधते . या संशयावरून अख्ख कुटुंब संपवण्याचा प्रयत्न बापाने केला . सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी यातून बचावले आहेत .तळेगाव एमआयडीसी पोलिसांना याची कल्पना देण्यात आली . ते घटनास्थळी आले तेव्हा दोन मुलींचे मृतदेह जवळजवळ होते , तर बापाचा मृतदेह त्यांच्यापासून आठ ते नऊ फुटांवर होता . नेमकं काय घडलं असेल हे पोलिसांच्याही लक्षात येत नव्हतं . आईने घडला प्रकार सांगितला , त्यानुसार चिट्ठी हाती लागली . त्यात मुलगी वाईट वळणावर लागली आहे , ती व्हॉट्सअॅपवर मुलाशी बोलते . म्हणून आम्ही अख्ख कुटुंब जीवन संपवत आहोत . यास कोणाला जबाबदार धरू नये असं त्यात नमूद होतं . हे वाचून पोलिसांनाही धक्का बसला . केवळ मुलगी व्हॉट्सअॅपवर एका मुलाशी बोलते म्हणून इतकं टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याने संतापही व्यक्त केला जातोय .