Home विदर्भ देवा आवरतं घ्या थोड ! समजुन तरी घ्या थोड! सुंदर कविता फक्त...

देवा आवरतं घ्या थोड ! समजुन तरी घ्या थोड! सुंदर कविता फक्त वाचा देव समजुनच घेईल बंर 

196
0

बलवंत मनवर

*बस झालं देवा अजून*
*किती जीव घेता ?*
*का हळूहळू असं करून*
*सगळ्यानांच नेता ?*

*काही केल्या कोरोनाची*
*थांबत नाही वारी*
*प्रत्येकालाच वाटतयं*
*लागती की काय बारी*

*अर्धे अधिक लोकं तर*
*धस्तीनेच मेले*
*तिकडून -तिकडंच म्हणे*
*मसनवाट्यात नेले*

*बॅक्टेरिया का व्हायरस*
*सायंटिस्टलाच कळंना*
*कोणतं घ्यावं औषध*
*याचं उत्तर मिळंना*

*माणसाला वाटत होतं*
*फार प्रगती केली*
*चंद्रावर मंगळावर*
*त्याने यानं नेली*

*खरंच बाबा तुझ्यापुढे*
*आम्ही नाही कोणी*
*नाक घासून पाया पडतो*
*हात जोडतो दोन्ही*

*जाउद्यानं देवा आता*
*तुम्हीच काढा मार्ग*
*थोडे दिवस जगू द्या*
*नको आत्ताच स्वर्ग*

*बघा बघा सगळं जग*
*कसं भकास झालं*
*देवळाचं दार सुद्धा*
*गच्च बंद झालं*

*अल्ला हो अकबरची*
*बांग येत नाही*
*राम कृष्ण हरि आणि*
*पालखी निघत नाही*

*चार भिंतीत माणूस कोंडला*
*येत नाही मजा*
*बस झालं देवा अजून*
*किती देणार सजा ?*

*जाणं येणं हिंडणं-फिरणं*
*सारं झालं बंद*
*मातीचा फुलांचा*
*संपून गेला गंध*

*धबधबे हिरवी झाडं*
*टीव्हीत पहात बसतो*
*सहलीचे फोटो पाहून*
*खोटं खोटं हसतो*

*हात जोडून विनंती आहे*
*देवा आवरतं घ्या*
*तुम्हीच आता कोरोनाला*
*तुमच्या सोबत न्या*