Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 588 जण कोरोनामुक्त तर पाच हजारांच्या वर रिपोर्ट निगेटिव्हसह 17 मृत्युसह...

यवतमाळ जिल्हात 588 जण कोरोनामुक्त तर पाच हजारांच्या वर रिपोर्ट निगेटिव्हसह 17 मृत्युसह 1075 जण पॉझेटिव्ह

409
0

 

       यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण तसेच मृत्युच्या संख्येत वाढ होत असली तरी एकाच दिवसांत बरे होण्याचे प्रमाण आणि दिवसभरातील एकूण रिपोर्टपैकी निगेटिव्ह रिपोर्ट येण्याचे प्रमाणसुध्दा लक्षणीय आहे. रविवारी 588 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर एकाच दिवशी 5279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 6354 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1075 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5839 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2692 तर गृह विलगीकरणात 3147 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 40647 झाली आहे. 24 तासात 588 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 33922 आहे. तर जिल्ह्यात एकूण 886 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.79 असून मृत्युदर 2.18 आहे.

गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 17 मृत्यु झाले असून यातील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर तीन मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. एकूण 17 मृतांपैकी एक मृत्यु यवतमाळ जिल्ह्याबाहेरील आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 55, 65, 73 वर्षीय पुरुष आणि 45, 65, 70 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 60, 65, 73 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 47 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 45 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 62 वर्षीय महिला, झरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये दिग्रस येथील 35 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 41 वर्षीय पुरुष आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील 65 वर्षीय पुरुष आहे.

            रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1075 जणांमध्ये 682 पुरुष आणि 393 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 260 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 197, पांढरकवडा 175, पुसद 109, दारव्हा 64, दिग्रस 61, वणी 29, मारेगाव 28, बाभुळगाव 26, नेर 26, आर्णि 22, कळंब 20, महागाव 18, नेर 18, घाटंजी 12 आणि इतर शहरातील 10 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 344722 नमुने पाठविले असून यापैकी 341673 प्राप्त तर 3049 अप्राप्त आहेत. तसेच 301026 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

          जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 557 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 20 बेड शिल्लक आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयातील 410 ऑक्सीजन बेडपैकी 340 जणांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे. मात्र उर्वरीत 70 रुग्ण ऑक्सीजन बेडवर भरती असले तरी त्यांना ऑक्सीजनची आवश्यकता नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा या तीन डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 180 बेडपैकी 83 रुग्णांसाठी उपयोगात, 97 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 28 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2278 बेडपैकी 1545 उपयोगात तर 733 शिल्लक आणि 20 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 729 बेडपैकी 536 उपयोगात तर 193 बेड शिल्लक आहेत.