महत्वाची बातमी

भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडले महिलेचा जागीच मृत्यू

Advertisements

रामनगरजवळ भीषण अपघात अपघातानंतर बसचालक पसार….!!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २८ :- खासगी कंपनी कामगारांची वाहतूक करणा-या बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रामनगरातील सह्याद्री हॉस्पीटलसमोर घडली. या भीषण अपघातात ललीता शंकर ढगे (वय ३९, रा.कासलीवाल पूर्व, चिकलठाणा विमानतळासमोर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालकाने बससह घटनास्थळावरून धुम ठोकल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.


दिलेल्या माहितीनुसार, ललीता ढगे या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी जिमसाठी गेल्या होत्या. जिममधुन ललीता ढगे या आपल्या दुचाकीवरून घराकडे परत जात असतांना रामनगरातील सह्याद्री हॉस्पीटलसमोर त्यांच्या दुचाकीच्या चाकात रस्त्यावर पडलेले वायर अडकल्याने त्यांचा तोल जावून त्या खाली पडल्या. नेमक्या त्याच वेळेस चिकलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे जात असलेल्या कंपनी कामगारांची वाहतूक करणा-या खासगी बसचे चाक ललीता ढगे यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर बसचालकाने बससह घटनास्थळावरून धुम ठोकली.
या अपघाताची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांसह ललीता ढगे यांचे पती शंकर विठ्ठल ढगे (वय ४४) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ललीता ढगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...