Home पश्चिम महाराष्ट्र पबजी खेळत असताना खाली पडला व झाला मृत्यू….

पबजी खेळत असताना खाली पडला व झाला मृत्यू….

25
0

दुःखद घटना….

अमीन शाह

देहूरोड पुणे , दि. १८ :- पबजी गेमने आतापर्यंत अनेक तरुणाईचा जीव घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये या गेमवर बंदीही घालण्यात आली पण यातून तरुणांची आत्महत्या काही थांबली नाही. पुण्याच्या देहूरोडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पबजी गेम खेळत असताना एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
पब्जी गेम खेळत असताना विचित्र प्रकारे हावभाव करून बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना देहूरोड येथील शिंदेवस्ती घडली. हर्षल मेमाने असे मृत्यूमुखी पडलेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 16 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास हर्षल हा पब्जी गेम खेळत असताना विचित्र हावभाव करू लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.

नातेवाईकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ जवळच असलेल्या ओजस रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण मेमाने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पबजी गेममुळे मानसिक संतुलन हरवल्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. मोबाइलवर सातत्याने पबजी गेम (PUBG) खेळल्यामुळे तरुणाई अत्यवस्थ आहे. त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये असंच एक प्रकरण समोर आलं होतं. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Unlimited Reseller Hosting