Home महत्वाची बातमी पत्रकारांच्या समस्यां सोडविणार – अभिजित पाटील फाळके

पत्रकारांच्या समस्यां सोडविणार – अभिजित पाटील फाळके

173

पत्रकार संरक्षण समितीचे निवेदन….

वर्धा , दि. १८ :- ग्रामीण आणि शहरी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधीचे अधिकारी आणि शासनाशी मंत्र्याशी चर्चा करून समस्या सोडवू असे आशवासन राहुल प्रियका गांधी सेना चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अभिजित पाटील फाळके यांनी दिले,
आज अभिजित पाटील फाळके विश्रामगृह वर्धा येथे आले असता पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने निवेदन देण्याचे आले,
पत्रकारिता हि लोकशाही मधील चोथा स्तंभ असून समाजातील चांगल्या- वाईट घटना दररोज समाजाला देण्याचे काम करतो ,या सर्व कामात ग्रामीण पत्रकाराची महत्वाची भूमिका असते, पत्रकारितेचा पाया ग्रामीण भागावर आहे ,मात्र राज्य सरकार कडून ग्रामीण पत्रकार हा घटक दुर्लक्षित आहे ,म्हणून शहरी किंवा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सोई सवलती दिल्या जाते त्याच प्रमाणे ग्रामीण पत्रकारांना सुद्धा देण्यात यावा.

केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि हा कायदा ग्रामीण पत्रकारांना लागू करावा ,ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यात यावी ,अधिस्वीकृती मिळण्याकरिता त्यातील अटी शिथिल कराव्या,राज्य सरकारच्या शासकीय समितीवर अशासकीय सदस्य निवडताना पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी,
अधिस्वीकृती धारक पत्रकाराना मिळणाऱ्या सोयी बस प्रवास,रेल्वे प्रवास,टोल नाका सवलत,आरोग्य सेवा ,आदी सेवा त्वरित लागू कराव्या , ग्रामीण पत्रकारांना घरकुल योजना मिळण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये पत्रकारांना राखीव घरे करावी,ग्रामीण पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे ,खाजगी अथवा शासकीय कॉन्व्हेट मध्ये पत्रकारांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवाव्या,या मागण्याचे निवेदन पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने जिल्हाध्यक्ष रविराज घुमे जिल्हासचिव योगेश कांबळे कार्याध्यक्ष शेख सत्तार ,सेलु तालुकाध्यक्ष गजानन जिकार, यांनी दिले यावेळी जिल्हाध्यक्ष ,वर्धा जिल्हासचिव उपस्थित होते.